Upcoming 5G Smartphones: बार्सिलोना येथे झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस २०२४ मध्ये टेक्नो पोवा 6 सीरिज लॉन्च करण्यात आली. त्यानंतर हा फोन भारतात कधी लॉन्च होणार, याबाबत अनेकांना उस्तुकता लागली होती. या फोनच्या लॉन्चिंग डेटबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. हा फोन मार्च अखेरपर्यंत भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. पोवा सीरिजने बाजारात बरीच लोकप्रियता मिळवली आहे.
टेक्नोने दिलेल्या माहितीनुसार, टेक्नो पोवा ६ प्रो 5G स्मार्टफोन येत्या २९ मार्च २०२४ रोजी लाँच केला जाईल. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि इतर काही उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा बजेट स्मार्टफोन असू शकतो.
टेक्नोनुसार, पोवा ६ प्रो 5G मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाचा फुल-एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६०८० ५जी गेमिंग प्रोसेसर सह १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी मेमरी देण्यात आली. फोटोग्राफीसाठी टेक्नो पोवा ६ प्रो 5G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळत आहे, ज्यामध्ये १०८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळत आहे. फोनमध्ये ६ हजार एमएएच बॅटरी आहे, जी ७० वॅट चार्जिंग आणि १० वॅट रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. टेक्नो पोवा ६ प्रो ५जी अँड्रॉइड १४ वर आधारित हायओएसवर चालतो. हा फोन डिव्हाइस ग्रीन आणि ग्रे अशा दोन रंगांमध्ये बाजारात उपलब्ध असेल.
टेक्नो पोवा ६ प्रो 5G किंमत अद्याप समोर आलेली नाही. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत १४ हजार ९९९ रुपये होती. त्यामुळे ही किंमत १५ हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. पण हा केवळ अंदाज आहे.