Tecno Pova 6 Neo 5G: टेक्नो आपला नवा स्मार्टफोन टेक्नो पोवा ६ भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा फोन येत्या ११ सप्टेंबर रोजी लॉन्च होणार असून अॅमेझॉनवर त्याची विक्री होणार आहे. फोनमध्ये अनेक एआय फीचर्स पाहायला मिळतील, असे कंपनीने आधीच सांगितले आहे. कंपनीचा दावा आहे की, हा सेगमेंटमधील पहिला 5G फोन असेल, जो १०८ मेगापिक्सल एआय कॅमेरासह येईल. लॉन्चिंगपूर्वीच फोनची मायक्रोसाइट अॅमेझॉनवर लाइव्ह झाली आहे, ज्यामुळे त्याचे खास फीचर्स स्पष्ट होतात.
मायक्रोसाइटनुसार, या स्मार्टफोनमध्ये एआयजीसी पोर्ट्रेट, एआय कटआऊट, एआय मॅजिक इरेजर, एआय आर्टबोर्ड, एआय वॉलपेपर आणि आस्क एआयसह एआय सूट असेल. हा फोन अॅमेझॉन स्पेशल असेल, असेही म्हटले जात आहे. हा फोन एक्सक्लुझिव्ह अॅमेझॉनवर विकला जाईल, असे सूचित केले जात आहे. मायक्रोसाईटवर असाही दावा केला जात आहे की, हा सेगमेंटचा पहिला 5G फोन असेल, जो १०८ एमपी एआय कॅमेरासह येईल. मात्र, या व्यतिरिक्त फोनच्या कोणत्याही फीचरची माहिती मायक्रोसाईटवर देण्यात आलेली नाही.
मात्र, हा फोन यापूर्वीच जागतिक बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. परंतु, भारतात लॉन्च होणाऱ्या फोनमध्ये स्पेसिफिकेशन्स वेगळे असतील. हा फोन नायजेरियन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील लिस्ट करण्यात आला आहे, जिथे ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २५५,३६० एनजीएन म्हणजेच सुमारे १३ हजार ५०० रुपये आहे.
फोनमध्ये ६.७८ इंचाचा फुल एचडी प्लस डॉट डिस्प्ले मिळेल, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येईल. हा फोन मीडियाटेक हेलियो जी ९९ अल्टिमेट प्रोसेसरसह सुसज्ज असेल, जो इनफिनिक्स नोट ४० प्रोला देखील पॉवर देतो. जागतिक बाजारात हा फोन ८ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड १४ वर चालतो. यात ५० मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ३३ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ७००० एमएएचची मोठी बॅटरी असणार असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक स्तरावर हा फोन सिल्व्हर, ब्लॅक आणि ग्रीन कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनच्या इतर खास फीचर्समध्ये ड्युअल 4G व्हीओएलटीई, जीपीएस, वाय-फाय, एनएफसी, डॉल्बी अॅटमॉससह ड्युअल स्पीकर्स आणि फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश आहे.