Tecno Pop 9 5G: ४८ मेगापिक्सल एआय कॅमेरा असलेला 5G फोन अवघ्या ८ हजार ४९९ रुपयांत लॉन्च-tecno pop 9 5g launched in india features specifications and more ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tecno Pop 9 5G: ४८ मेगापिक्सल एआय कॅमेरा असलेला 5G फोन अवघ्या ८ हजार ४९९ रुपयांत लॉन्च

Tecno Pop 9 5G: ४८ मेगापिक्सल एआय कॅमेरा असलेला 5G फोन अवघ्या ८ हजार ४९९ रुपयांत लॉन्च

Sep 24, 2024 05:27 PM IST

Tecno Pop 9 5G Launched: चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नोने आपला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन टेक्नो पॉप ९ भारतात लॉन्च केला आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ४८ मेगापिक्सल एआय फीचर्स असलेला कॅमेरा मिळत आहे.

टेक्नो पॉप ९ 5G भारतात लॉन्च
टेक्नो पॉप ९ 5G भारतात लॉन्च

Tecno Pop 9 5G Launched in India: चिनी टेक ब्रँड टेक्नोने आपला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन टेक्नो पॉप ९  भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. अ‍ॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू होण्यापूर्वी हा फोन लॉन्च करण्यात आला आहे. ग्राहकांना पुढील महिन्यात खास सवलतीच्या दरात हा फोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. नवीन डिव्हाइसमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, डायनॅमिक पोर्ट आणि ४८ एमपी एआय कॅमेरा सारखे आश्चर्यकारक फिचर्स मिळत आहेत.

नवीन स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी यात स्टिरिओ स्पीकर्स आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ४ जीबी रॅम आणि ४ जीबी व्हर्च्युअल रॅम क्षमतेसह एकूण रॅम ८ जीबीपर्यंत पोहोचू शकते. यात ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज पर्याय निवडण्याचा पर्याय आहे. याशिवाय, हा फोन चार वर्षांहून अधिक काळ लॅग-फ्री अनुभव देईल, असा दावा कंपनीने केला आहे.

टेक्नो पॉप ९ 5G: फीचर्स

टेक्नो पॉप ९ 5G च्या नवीन स्मार्टफोनमध्ये एआय फीचर्ससह बॅक पॅनेलवर ४८ एमपी सोनी आयएमएक्स ५८२ कॅमेरा सेन्सर आहे. याशिवाय, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि हे डिव्हाइस आयपी ५४ डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स प्रदान करते. याची ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी १८ वॅट चार्जिंगने समर्थित आहे. अँड्रॉइड १४ वर आधारित हायओएस १४ सह येणाऱ्या टेक्नो पॉप ९ ५ जी मध्ये ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि आयआर सेन्सर देण्यात आला आहे.

टेक्नो पॉप ९ 5G: किंमत आणि उपलब्धता 

टेक्नो पॉप ९ च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या मॉडेलची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. तर, ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेले मॉडेल ९ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या डिव्हाइसची प्री-ऑर्डर सुरू झाली असून ७ ऑक्टोबरपासून अ‍ॅमेझॉनवर सेल सुरू होणार आहे. बँकेच्या ऑफरनंतर १००० रुपयांच्या डिस्काउंटमुळे ८ हजार ४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. नवीन डिव्हाइस मिडनाइट शॅडो, अ‍ॅज्युर स्काय आणि अरोरा क्लाऊड या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसेच बॉक्समध्ये दोन एक्स्ट्रा बॅक पॅनेल स्किन्सदेखील देण्यात येणार आहेत.

Whats_app_banner
विभाग