Tecno Phantom V2 Series Launched in India: फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा तुमचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. टेक्नोने दोन अत्यंत स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने आज (६ डिसेंबर २०२४) टेक्नो फँटम व्ही २ सीरिज भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या सीरिजमध्ये पुस्तकासारखा ओपनिंग फँटम व्ही फोल्ड २ आणि फ्लिप स्टाइल फँटम व्ही फ्लिप २ स्मार्टफोनचा समावेश आहे. कंपनीने त्यांना परवडणाऱ्या किमतीत लॉन्च केले आहे. त्यांची सुरुवातीची किंमत केवळ ३४ हजार ९९९ रुपये आहे.
टेक्नो फँटम व्ही २ सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन मॉडेल्सचा समावेश आहे. फँटम व्ही फोल्ड २ ची किंमत ७९ हजार ९९९ रुपये आहे. तर, फँटम व्ही फ्लिप २ ची किंमत ३४ हजार ९९९ रुपये आहे. या किंमती मर्यादित काळासाठी आहेत. नंतर त्यांच्या किंमती वाढू शकतात. दोन्ही मॉडेल्सची विक्री १३ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. ते अॅमेझॉनवरून खरेदी करता येतील. फँटम व्ही फ्लिप २ क्रस्ट ग्रीन आणि रिपलिंग ब्लू या दोन रंगांमध्ये खरेदी करता येईल. फँटम व्ही फ्लिप २ ट्रॅव्हर्टाइन ग्रीन आणि मूनडस्ट ग्रे या दोन रंगांमध्ये खरेदी करता येईल.
दोन्ही फोन अत्यंत दमदार आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, फँटम व्ही फोल्ड २ दीर्घकाळ टिकेल यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. याच्या डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ प्रोटेक्शन आणि एअरोस्पेस ग्रेड हिंज देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, फँटम व्ही फ्लिप २ आपल्या दिवसातील प्रत्येक आव्हान हाताळण्यासाठी तयार केले गेले आहे. डिस्प्लेमध्ये एरोस्पेस ग्रेड हिंज आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ८ प्रोटेक्शन आहे. हे दिसायला खूप मजबूत आहे आणि प्रीमियम दिसते. कंपनीचे म्हणणे आहे की, दोन्ही मॉडेल्सची ४ लाख पेक्षा जास्त वेळा चाचणी घेण्यात आली आहे.
अॅमेझॉनवर दिलेल्या माहितीनुसार, फोनमध्ये एआय इमेज रिमूव्हल, एआय इमेज कटआऊट, एआय रायटिंग, सर्कल टू सर्च आणि हॅन्डराइटिंग टू टेक्स्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या