Techno Pop 9 5G Launched In India : टेक्नोने सप्टेंबर २०२४ मध्ये टेक्नो पॉप ९ 5G भारतात लॉन्च केला होता. हा फोन ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी+ १२८ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता. आता कंपनीने या फोनचे नवे व्हेरियंट लॉन्च केले आहे, यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. फोनच्या या नव्या व्हेरियंटची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. अॅमेझॉन इंडियावर ८ जानेवारीपासून याची विक्री सुरू होणार आहे. टेक्नोच्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरी अशा अनेक फीचर्च मिळत आहेत.
कंपनी या फोनमध्ये १६१२×७२० पिक्सल रिझोल्यूशनसह ६.६ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
टेक्नोचा हा फोन ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायात येतो. फोनमध्ये मेमरी फ्यूजन फीचर देखील देण्यात आले आहे. यासह याची रॅम ८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. प्रोसेसरच्या बाबतीत, आपल्याला आर्म माली-जी ५७ एमसी २ जीपीयू सह मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० चिपसेट मिळेल.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅशसह ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि एआय लेन्स देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.
फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएसबद्दल बोलायचे झाले तर फोन हायओएस १४ वर आधारित अँड्रॉइड १४ वर काम करतो. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी या फोनमध्ये साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी 5G एसए/एनएसए, ड्युअल 4G व्हीओएलटीई, वाय-फाय ८०१.११ एसी, ब्लूटूथ ५.१, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि एनएफसी चा समावेश आहे. टेक्नो पीओपी ९ 5G मिडनाइट शॅडो, अॅज्युर स्काय आणि अरोरा क्लाऊड या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फोनच्या नव्या व्हेरिएंटबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी टेक्नोच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
संबंधित बातम्या