मराठी बातम्या  /  बिझनेस  /  TCS : महिलांना नोकरी देण्यात टीसीएस अव्वल, ५०० मौल्यवान कंपन्यांच्या यादीत कंपनीचा समावेश

TCS : महिलांना नोकरी देण्यात टीसीएस अव्वल, ५०० मौल्यवान कंपन्यांच्या यादीत कंपनीचा समावेश

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 03, 2022 05:49 PM IST

देशातील सर्वात मौल्यवान ५०० कंपन्यांच्या यादीत पहिल्या १० मध्ये टीसीएसने स्थान पटकावले आहे. कंपनीत महिला कर्मचाऱ्यांना अधिक प्राधान्य दिल्यामुळे कंपनीने अव्वल स्थान पटकावले आहे.

TCS HT
TCS HT

TCS : हूरुन इंडियाच्या देशातील सर्वात मौल्यवान ५०० कंपन्यांच्या यादीत पहिल्या १० मध्ये टीसीएसने स्थान पटकावले आहे. कंपनीत महिला कर्मचाऱ्यांना अधिक प्राधान्य दिल्यामुळे कंपनीला अव्वल स्थान पटकावले आहे. टीसीएसमध्ये अंदाजे ३५ टक्के म्हणजे अंदाजे २.१ लाख महिला कर्मचारी काम करतात. यादीत समाविष्ट ५०० पैकी ४१० कंपन्यांनी त्यांच्या संचालक मंडळात महिलांना अधिक प्राधान्य दिले आहे.

या कंपन्यांनी गेल्या वर्षभरात अंदाजे ३.९ लाख नव्या नोकऱ्या दिल्या आहेत. यात पहिल्यापासून अंदाजे ११.६ लाख महिला काम करत आहेत. याशिवाय इन्फोसिस कंपनीत अंदाजे १,२४,४९८ महिला काम करतात. विप्रोमध्ये अंदाजे ८८, ९४६७ आणि एचसीएलमध्ये ६२,७८९ महिला काम करतात.

रिलायन्स सर्वाधिक मौल्यवान कंपनी

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीला सर्वाधिक मौल्यवान कंपनी म्हणून स्थान मिळाले आहे. टीसीएस दुसऱ्या क्रमांकाची आणि एचडीएफसी बॅक ही भारतातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मौल्यवान कंपनी ठरली आहे. अदानी टोटल गॅस आणि अदानी एंटरप्रायझेस या यादीत गौतम अदानी यांच्या दोन कंपन्या आहेत.

महिला संचालकांची संख्या अधिक

५०० सर्वात मौल्यवान कंपन्यांमध्ये संचालक मंडळाच्या १६% पदांवर महिला आहेत. या कंपन्यांमध्ये ६६४ महिलांचा संचालक म्हणून समावेश करण्यात आला आहे. अपोलो हॉस्पिटल एंटरप्रायझेसने सर्वाधिक सहा महिला संचालकांची नियुक्ती केली आहे, तर गोदरेज कंझ्युमर्स, पिरामल आणि इंडिया सिमेंट्सने प्रत्येकी पाच महिला संचालकांची नियुक्ती केली आहे.

 

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग