टाटाच्या 'या' शेअरमध्ये पहिल्या दिवशी १ लाख रुपये लावले असते तर आता ३३ लाख झाले असते!-tcs share turned 1 lakh rupee investment into more than 33 lakh company given 3 bonus share ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  टाटाच्या 'या' शेअरमध्ये पहिल्या दिवशी १ लाख रुपये लावले असते तर आता ३३ लाख झाले असते!

टाटाच्या 'या' शेअरमध्ये पहिल्या दिवशी १ लाख रुपये लावले असते तर आता ३३ लाख झाले असते!

Aug 26, 2024 03:32 PM IST

TCS Share Price : टाटा समूहातील आघाडीची कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसनं शेअर बाजारात २० वर्षे पूर्ण केली आहेत.

टाटाच्या 'या' शेअरमध्ये पहिल्या दिवशी १ लाख रुपये लावले असते तर आता ३३ लाख झाले असते!
टाटाच्या 'या' शेअरमध्ये पहिल्या दिवशी १ लाख रुपये लावले असते तर आता ३३ लाख झाले असते!

TCS Share Price : टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होऊन २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत टीसीएसच्या शेअरची वाटचाल अपवाद वगळता वरच्या दिशेनं राहिली आहे. या संपूर्ण काळात एका विश्वासानं टीसीएस सोबत राहिलेल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.  

टीसीएसचे शेअर्स २५ ऑगस्ट २००४ रोजी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले होते. टीसीएसच्या आयपीओसाठी ७७५ ते ९०० रुपये असा दरपट्टा निश्चित करण्यात आला होता. आयपीओमध्ये टीसीएसच्या शेअर्सची इश्यू प्राइस ८५० रुपये होती. आयपीओला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. कंपनीचे शेअर २५ ऑगस्ट २००४ रोजी मुंबई शेअर बाजारात २६.६ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर १,०७६ रुपयांवर सूचीबद्ध झाले. 

एखाद्या व्यक्तीनं लिस्टिंगच्या दिवशी टीसीएसच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर या शेअर्सची किंमत सध्या ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती.

असा झाला असता गुंतवणूकदारांचा फायदा?

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा शेअर २५ ऑगस्ट २००४ रोजी १६.६ टक्क्यांहून अधिक प्रीमियमसह १०७६ रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. जर एखाद्या व्यक्तीनं २५ ऑगस्ट २००४ रोजी टीसीएसच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला कंपनीचे ९३ शेअर्स मिळाले असते. टीसीएसनं लिस्टिंगनंतर आपल्या गुंतवणूकदारांना ३ वेळा बोनस शेअर्सची भेट दिली आहे. तीन वेळा १:१ या प्रमाणात बोनस शेअर दिले आहेत. हे बोनस शेअर्स मूळ ९३ शेअरमध्ये मिळवल्यास एकूण शेअर्सची संख्या ७४४ शेअर्स वर जाते. टीसीएसचा शेअर २६ ऑगस्ट २०२४ रोजी ४५४४.७५ रुपयांवर व्यवहार करत आहे. त्यानुसार ७४४ शेअर्सचं सध्याचं मूल्य ३३.८१ लाख रुपये आहे. कंपनीनं दिलेला लाभांश यात समाविष्ट करण्यात आलेला नाही.

कोणत्या वर्षी दिला बोनस?

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) आपल्या गुंतवणूकदारांना ३ वेळा बोनस शेअर्स भेट दिले आहेत. कंपनीनं जुलै २००६ मध्ये १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक शेअरसाठी १ बोनस शेअर दिला. त्यानंतर जून २००९ मध्ये १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. मे २०१८ मध्ये देखील १:१ या प्रमाणात बोनस शेअर दिले. आयपीओच्या आधी २००३ मध्ये टीसीएसचा महसूल १ अब्ज डॉलरवर पोहोचला होता.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)