मराठी बातम्या  /  बिझनेस  /  New financial year : नव्या आर्थिक वर्षात असं करा गुंतवणूकीचं प्लानिंग, ईएलएसएस ठरतोय चांगला पर्याय

New financial year : नव्या आर्थिक वर्षात असं करा गुंतवणूकीचं प्लानिंग, ईएलएसएस ठरतोय चांगला पर्याय

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 29, 2023 01:24 PM IST

New financial year : चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ संपायला आता अवघे काहीच दिवस बाकी राहिले आहेत. अशावेळी नव्या आर्थिक वर्षात पदार्पण करताना आम आदमी कर बचतीसाठीच्या पर्यायांच्या शोधात आहेत.

New financial year HT
New financial year HT

New financial year : चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ संपायला अवघे काही दिवस उरले असताना, अनेक लोक कर वाचवण्यासाठी पर्याय शोधत आहेत. अनेकजण चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसात त्यासाठी धावपळ करतात. जेणेकरुन नव्या आर्थिक वर्षात त्यांना आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर बचतीचा लाभ मिळू शकेल. पण ही चुकीची रणनीती आहे.

वर्षाच्या शेवटच्या दिवसांऐवजी वर्षभर शिस्तबद्ध राहून करबचतीसाठी केलेली गुंतवणूक तुम्हाला अधिक फायदे देऊ शकते. जर तुम्ही कर वाचवण्यासाठी असा काही पर्याय शोधत असाल तर इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्हणजेच ईएलएसएसमध्ये नियमित गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करण्याची उत्तम संधी आहे.

दुसरीकडे, भविष्यात कोणतेही निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बचत केल्यानंतर निव्वळ केलेली बचत कामी येत नाही. त्यामुळे लाखो करदाते वर्षाच्या शेवटी कर बचतीचे मार्ग निवडतात.

८० सी कर लाभांसाठी योग्य निवड महत्त्वाची

पगारदार करदात्यांबद्दल बोलायचे तर भविष्य निर्वाह निधी कपातीद्वारे कर बचतीसाठी त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण योगदान दिले जाते. पीएममध्ये गुंतवलेल्या पैशावर आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर लाभ उपलब्ध आहे. परंतु या कलमांतर्गत पीएफ योगदानाव्यतिरिक्त, इतर अनेक पर्यायांद्वारे फायदे मिळू शकतात. परंतु यापैकी योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे.

ईएलएलएस उत्तम पर्याय

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) हा सध्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. यात कलम ८० सी अंतर्गत कर वाचवण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय पर्याय आहे. ईएलएसएस गुंतवणूकदाराला दुहेरी फायदे देते. याद्वारे, तुम्ही करबचतीसोबत त्यातील इक्विटी एक्सपोजरमुळे उत्तम परताव्याद्वारे तुमची संपत्ती वाढवण्याची संधी देखील मिळते.

एसआयपीचाही पर्याय

ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करताना एखादी व्यक्ती सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) ची निवड करू शकते. वर्षभर एसआयपीद्वारे ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. कर वाचवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही उत्पादनात गुंतवणूक करताना शेवटच्या मिनिटाला गडबड करावी लागत नाही.

वर्षाच्या सुरुवातीपासूनच कर बचतीचा पर्याय निवडा

जर तुम्ही आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला करबचतीसाठी गुंतवणुकीची योजना आखली असेल, तर तुम्हाला तुमच्या इतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी निधीची चिंता न करता गुंतवणूकीचे योग्य प्लानिंग करता येते. त्याचप्रमाणे दर महिन्याला कर बचतीच्या स्वयंचलित प्रक्रियेद्वारे तुम्हाला नियमित गुंतवणूक करण्याची सवयही लागते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग