मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tax saver FD : करबचतीसाठी या बँकांच्या एफडी देतील अधिक नफा, बचतीसह मिळेल अधिक लाभ

Tax saver FD : करबचतीसाठी या बँकांच्या एफडी देतील अधिक नफा, बचतीसह मिळेल अधिक लाभ

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 25, 2023 04:00 PM IST

रिझर्व्ह बँकेने (RBI) २०२२ मध्ये रेपो दर सलग पाच वेळा वाढवल्यानंतर अनेक बँकांनी कर बचत एफडीवरील व्याजदर वाढवले ​​आहेत. त्यामुळे अनेक छोट्या बँका या एफडीवर चांगले व्याज देत आहेत.

Tax saver FD HT
Tax saver FD HT

Tax saver FD : रिझर्व्ह बँकेने (RBI) २०२२ मध्ये रेपो दर सलग पाच वेळा वाढवल्यानंतर अनेक बँकांनी कर बचत एफडीवरील व्याजदर वाढवले ​​आहेत. त्यामुळे अनेक छोट्या बँका एफडीवर चांगले व्याज देत आहेत.

मार्च महिना जवळ येतो तेंव्हा अनेकजण करबचतीचे मार्ग शोधतात. तुम्हालाही करमुक्त गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अनेक बँकांनी करमुक्त मुदत ठेवींवर व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे या करमुक्त एफडीमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना कर वाचवण्यासह अधिक व्याजही मिळू शकतो.

करमुक्त मुदत ठेवींवर कलम 80C अंतर्गत अंदाजे दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा लाभ मिळतो. परंतु या एफडी ५ वर्षांच्या लॉक-इनसह येतात. गेल्या काही दिवसांपासून अनेक छोट्या बँका या एफडीवर चांगले व्याज देत आहेत. रिझर्व्ह बँकेने गेल्यावर्षी रेपो दरात सलग पाच वेळा वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी कर बचत एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. छोट्या बँका अशा एफडीवर 7.60 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँक कर बचत ठेवींवर ७.२० टक्क्यांपर्यंत व्याजदर देतात. लघु वित्त बँकांमध्ये, या दोन्ही बँकांचे सर्वोत्तम व्याजदर आहेत. यामध्ये १.५ लाख रुपयांची गुंतवणूक पाच वर्षांत २.१४ लाख रुपयांपर्यंत वाढते.डीसीबी बँक कर बचत ठेवींवर ७.६ टक्के व्याज देते. याशिवाय येस बँक, सिटी युनियन बँक, आरबीएल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक यासह अनेक बँका कर बचत ठेवींवर अंदाजे ७ टक्क्यांपर्यंत व्याज देतात. ज्यामुळे अंदाजे दीड लाख रुपयांची गुंतवणूक पाच वर्षांत २.१२ लाख रुपये होते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग