मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata Motors : या तीन नव्या एसयुव्ही टाटा मोटर्स बाजारात आणणार, वाहन कंपन्यात रंगणार 'काँटे की टक्कर'

Tata Motors : या तीन नव्या एसयुव्ही टाटा मोटर्स बाजारात आणणार, वाहन कंपन्यात रंगणार 'काँटे की टक्कर'

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 27, 2023 01:35 PM IST

Tata motors upcoming cars : टाटा मोटर्स पुढील काही महिन्यांत पंच आणि अल्ट्रोजच्या सीएनजी व्हर्जनही सादर करणार आहेत. कंपनीच्या लाइनअपमध्ये ३ नवीन एसयुव्ही देखील येणार आहेत, यामुळे इतर कंपन्यांसाठी चुरशीची स्पर्धा निर्माण होणार आहे.

tata nexon HT
tata nexon HT

Tata motors upcoming cars : लोकप्रिय कार निर्माता टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांच्या नेक्साॅन, हॅरियर्स आणि सफारी एसयुव्हीचे नवे डार्क एडिशन लाँच केले. कंपनी लवकरच २०२३ सफारी आणि हॅरियरला नवीन फिचर्स आणि बीएस ६ फेज २ मानदंडांसह सादर करेल. टाटा मोटर्स पुढील काही महिन्यांत पंच आणि अल्ट्रोजच्या सीएनजी आवृत्त्याही सादर करणार आहेत. याशिवाय कंपनीच्या ताफ्यात ३ नवीन एसयुव्ही येणार आहेत. यामुळे आता एसयुव्ही सेगमेंटमधील इतर कंपन्यांना स्पर्धा निर्माण होईल.

टाटा नेक्साॅन

सध्या ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. नेक्सॉन पहिल्यांदा २०१७ मध्ये लॉन्च करण्यात आले होते. यानंतर, २०२० मध्ये त्याला मिड-लाइफ अपडेट मिळाले. कंपनीने आता नवीन नेक्सॉनवर काम सुरू केले आहे. नवीन नेक्सॉनमध्ये अनेक बदल केले जाऊ शकतात.नव्या एसयूव्हीला नवीन फ्रंट आणि रियर प्रोफाइल मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये १०.२५-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील दिली जाऊ शकते. यात नवीन १.२लीटर ३-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. ही एसयुव्हीदेखील विद्यमान १.५ली डिझेल इंजिनसह येईल.

टाटा मोटर्स कर्व्ह

टाटा मोटर्सने जानेवारीत नुकत्याच झालेल्या ऑटो एक्सपो २०२३ मध्ये कर्व्ह एसयुव्ही सादर केली. नवीन मॉडेल २०२४ मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. नवीन टाटा कर्व्ह पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह येईल. त्याची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टाॅस, मारुती ग्रँड व्हिटारा आणि टोयोटा हायरायडर्स या गाड्यांशी असेल. १०.२५ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले यासह अनेक आधुनिक वैशिष्ट्यांचा यात समावेश असेल.

टाटा हॅरियर ईव्ही

कंपनीने ऑटो एक्सपोमध्ये त्याची कॉन्सेप्ट व्हर्जन सादर केली होती. हॅरियर इलेक्ट्रिक देखील २०२४ मध्ये आणले जाईल. टाटा मोटर्सने बॅटरीच्या क्षमतेबद्दल काहीही सांगितलेले नाही. हे ड्युअल मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह सेट-अपसह येईल. नवीन मॉडेलमध्ये सुमारे ६० केव्हॅट क्षमतेचा बॅटरी पॅक असेल आणि सुमारे ४०० ते ५०० किमीची श्रेणी मिळणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग