मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Good News: भारतातील श्रीमंतांमध्ये झपाट्याने वाढ; टाटाने 'या' ब्रँडचे स्टोअर चौपटीने वाढवले

Good News: भारतातील श्रीमंतांमध्ये झपाट्याने वाढ; टाटाने 'या' ब्रँडचे स्टोअर चौपटीने वाढवले

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 10, 2023 03:42 PM IST

भारतातील उच्चभ्रू श्रीमंत ग्राहकांची अपेक्षित वाढीचा फायदा टायटनच्या झोया या हिरे दालनाला अधिक होताना दिसतोय. कारण याच वर्गाकडून हिऱ्याच्या वाढत्या खरेदीमुळे टाटाच्या झोया ब्रँडला 2027 पर्यंत त्यांची दालने तिप्पट करण्यासाठी चालना देत आहे.

zoya boutique HT
zoya boutique HT

टायटन कंपनीचा ९० टक्के महसूल हा दागिन्यांच्या विक्रीतून येतो. इतर १० टक्के हा उंची घड्याळे, चष्मा आणि परफ्यूम्सद्वारे मिळतो. त्यांचे चार ज्वेलरी ब्रॅड्स एकाच छताखाली आहेत. यात प्रामुख्याने तनिष्क फ्लॅगशिप, मिया ब्रॅड,कॅरेटलेन आॅनलाईन स्टोअर आणि झोया ब्रॅड्सचा समावेश आहे.

टाटा समुहाच्या ज्वेलरी डिव्हिजनने २०२७ पर्यंत झोया ब्रॅड्सचे चौपट विस्तारीकरण करण्याची योजना आखली आहे. या योजनेला बळ दिलंय ते तमाम भारतीय उच्चभ्रू वर्गातील दागिने प्रेमींनी.

नाइट फ्रँकच्या विश्लेषणानुसार, 2021 मध्ये 30 दशलक्ष डाॅलर्स किंवा त्याहून अधिक मालमत्ता असलेल्या अति-उच्च नेटवर्थ व्यक्तींच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत 11% वाढ झाली आहे. दागिन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सोन्यासाठी भारत सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. उच्चभ्रू श्रीमंतांच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी कमी होण्याची अपेक्षा नाही.
2026 मध्ये ही संख्या अंदाजे 39% ने वाढण्याचा अंदाज आहे. किंबहुना पुढील पाच वर्षांत किमान 1 दशलक्ष डाॅलर्स संपत्ती असलेल्या लोकांची संख्या जवळपास 77% ने वाढण्याचा अंदाज आहे.

तर टायटनचे सीईओ अजॉय चावला यांच्या म्हणण्यानुसार, पुढील पाच वर्षांत झोया बुटीकची संख्या 15 पर्यंत वाढवल्यास प्रत्येक बुटीकसाठी जवळपास 30 कोटी खर्च येईल. ब्रँडवरील महसूल कोविड पूर्व-साथीच्या विक्रीच्या संख्येपेक्षा पाच पटीने वाढला आहे. ही वाढ आता अधिक आक्रमकपणे सुरु राहिल असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

ते पुढे म्हणाले की, "भारतातून लक्झुरीला खूप छुपी मागणी आहे. आगामी काळात २०२६ पर्यंत उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तीच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होणार आहे. आताची ही फक्त सुरुवात आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मान्यताप्राप्त लक्झरी ब्रँड स्थापित करण्यासाठी टायटनने झोयामधील आंतरराष्ट्रीय विस्ताराला गती देण्याचीही योजना आखली आहे. तमाम भारतीयांसोबत जागतिक पातळीवरही झोया ब्रॅडला ‘हिरा है सदा के लिये’ ही ओळख अधिक झगमगाटी ठरणार आहे, हे निश्चित.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग