मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata steel and ONGC : टाटा स्टील ते ओएनजीसी, या कंपन्या देतील हाय रिटर्न्स

Tata steel and ONGC : टाटा स्टील ते ओएनजीसी, या कंपन्या देतील हाय रिटर्न्स

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 05, 2022 12:50 PM IST

Tata steel and ONGC : शुक्रवारी स्टाॅक मार्केटमध्ये सलग ८ दिवस सुरु असलेल्या तेजीला ब्रेक लागला. जागतिक आर्थिक स्थिती आणि नफाखोरी यांमुळे गेल्या आठवड्याच शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली.

share tips HT
share tips HT

Tata steel and ONGC :   शुक्रवारी स्टाॅक मार्केटमध्ये सलग ८ दिवस सुरु असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे. जागतिक आर्थिक स्थिती आणि नफाखोरी यांमुळे गेल्या आठवड्याच शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली.

शुक्रवारी स्टाॅर मार्केटमध्ये सलग ८ दिवस निर्माण झालेल्या तेजीला ब्रेक लागला आहे. जागतिक पातळीवरील कमकूवत आर्थिक स्थिती आणि नफाखोरी यांमुळे गेल्या आठवड्यातील शेवटच्या सत्रात निर्देशांकात घसरण पहायला मिळाली. ३० प्रमुख कंपन्यांचा समावेश असलेल्या सेंन्सेक्समध्ये ४१५ अंशांची घट नोंदवत तो ६२,८६८.५ अंश पातळीवर बंद झाला. निफ्टीतही ११६,४अंशांची घट होऊन तो अंदाजे १८,६९६ अंश पातळीवर बंद झाला. दरम्यान या घसरणीत बीएसई मि़डकॅप ०.८ टक्के आणि स्माॅल कॅप इंडेक्स ०.७ टक्के घसरणीसह बंद झाले होते. आजपासून सुरु झालेल्या नव्या आटवड्यात निर्देशांक कसा असेल याबाबत जाणून घेऊया.

चालू आठवड्यात मार्केट कसे राहिल ?

एचडीएफसी सिक्यूरिटीजचे तंज्ज्ञ नागराज शेट्टी म्हणतात की, विकली चार्टमध्ये निफ्टी सकारात्मक आहे.

या शेअर्ससंदर्भात तज्ज्ञ बुलिश आहेत.

टेक महिंद्रा - स्टाॅप लाँस १०९० रुपये, टार्गेट प्राईज ११३५ -१५० रुपये

काॅनकोर स्टाॅप लाॅस ७६० रुपये आणि टार्गेट प्राईज ८०० - ८२० रुपये

टाटा स्टील - स्टाॅप लाॅस - १०४ रुपये आणि टार्गेट प्राईज - १२० रुपये

ओएनजीसी ० स्टाॅप लाॅस १३२ रुपये आणि टार्गेट प्राईस - १५२ रुपये

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग