Tata Punch : टाटाची 'ही' गाडी सुरू झाली तरी कळत नाही! आवाजच करत नाही!
Tata Punch : मिनी एसयूव्ही पंच ही यूजर फ्रेंडली फिचर्समुळे लोकप्रिय एसयूव्ही सेगमेंटमधील कार आहे. आता कंपनीने तिला अधिक अत्याधुनिक केले आहे. नव्या व्हेरियंटमध्ये इंजिन आणि केबिन अधिक अपडेट केले आहे. खायियत जाणून घेऊया -
Tata Punch : मिनी एसयूव्ही पंच ही यूजर फ्रेंडली फिचर्समुळे लोकप्रिय एसयूव्ही सेगमेंटमधील कार आहे. आता कंपनीने तिला अधिक अत्याधुनिक केले आहे. नव्या व्हेरियंटमध्ये इंजिन आणि केबिन अधिक अपडेट केले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
आँक्टोबर २०२१ मध्ये दाखल झालेल्या टाटा समुहातील सर्वात सुरक्षित आणि स्वस्त पॅसेंजर लेव्हलच्या एसयूव्हीमध्ये पंचला मागणी सर्वाधिक आहे. नेक्साॅननंतर सर्वाधिक विक्री होणारी ही गाडी आहे. टाटा पंचचा समावेश २०२२ मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टाॅप १० गाड्यांमध्ये करण्यात आला आहे. पंचचे मिनी एसयूव्ही प्रोफाईल चांगल्या प्रकारे तयार करण्यात आले आहे. बजेट कारसोबत त्यात अनेक नाविन्यपूर्ण फिचर्सही देण्यात आले आहेत. कंपनीने आता या पंचला अधिक अपडेट केले आहे.
नव्या इंजिनचा समावेश
टाटा पंच नव्या आरडीई कम्प्लायन्स मोटर्स सह दाखल झाली आहे. यामुळे ग्राहकांना चांगला अनुभव मिळणार आहे. त्याच्या केबिनच्या अंतर्गत आणि इंजिनमधील आवाज बऱ्यापैकी कमी झाला आहे. केबिनच्या आत मोटरचा आवाज कमी झाला आहे. त्याशिवाय आता गाडीचे दरवाजे बंद झाल्यावर आतील एसी आणि पंखा आँटोमॅटिक बंद होतील. यामुळे त्याच्या केबिन स्पेसमध्ये आता पिन ड्राॅप सायलेन्स निर्माण झाला आहे.
इंजिनमधील आधुनिकेसह आरडीई कम्प्लायन्स बऱ्यापैकी आधीप्रमाणेच आहे. पावर आणि टाॅर्क आउटपूटमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता नाही. यात मिळणारे १.२ लीटर पेट्रोल मोटर अधिकाधिक ८६ पीएस ची पावर आणि ११३ एनएम पीक टाॅर्क निर्माण करते. पंच इको आणि सीटी ड्राईव्हसह उपलब्ध आहे.
संबंधित बातम्या