मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock to Watch : २२० रुपयांवर जाऊ शकतो टाटाचा ‘हा’ शेअर; मार्केट एक्स्पर्ट म्हणतात…

Stock to Watch : २२० रुपयांवर जाऊ शकतो टाटाचा ‘हा’ शेअर; मार्केट एक्स्पर्ट म्हणतात…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 03, 2023 06:51 PM IST

Tata Power Share Price : टाटा समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बाजार तज्ज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

Tata Group
Tata Group

Tata Power Share Price : चढउतार हा शेअर बाजाराचा नियम आहे. रोजच्या रोज अनेक कंपनीच्या शेअरचे भाव खाली-वर होत असतात. मात्र, काही शेअर अनेक दिवस एकाच किंमतीवर घुटमळत राहतात. अशा वेळी गुंतवणूकदार कंटाळून ते विकण्याचा मार्ग पत्करतात. मार्केट तज्ज्ञ अशा वेळी काही सल्ले देत असतात. असाच एक सल्ला आता टाटा पावर कंपनीच्या शेअरबद्दल देण्यात आला आहे.

टाटा पावर कंपनीचे शेअर तुमच्याकडं असतील तर ते लगेच विकू नका, असा सल्ला ब्रोकरेज फर्मनी दिला आहे. टाटा पॉवरचा शेअर पुढील काही दिवसांत २२० वर जाईल, असा अंदाज जेएम फायनान्शिअलनं वर्तवला आहे. सध्या हा शेअर २०८ रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. त्यामुळं ज्यांच्याकडं यापेक्षा कमी किंमतीत घेतलेले टाटा पावरचे शेअर असतील त्यांनी घाई करू नये, असं मत जेएम फायनान्शिअलनं व्यक्त केलंय. इतकंच नव्हे तर आत्ताच्या किंमतीवरही गुंतवणूक केल्यास पुढील काही दिवसांत ६ टक्क्यांपर्यंत नफा होण्याची शक्यता आहे.

टाटा पॉवर ही वीज क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीचं बाजार भांडवल ६६,५७४.९० कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत टाटा पॉवरचा एकत्रित निव्वळ नफा जवळपास दुपटीनं वाढून १०५२.१४ कोटी झाला आहे. कंपनीनं शुक्रवारी बीएसईला दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ दरम्यान व्यवसाय चांगला झाल्यामुळं नफा वाढला आहे.

२०२१-२२ या आर्थिक वर्षातील डिसेंबर तिमाहीत टाटा पॉवरचा एकत्रित निव्वळ नफा ५५१.८९ कोटी रुपये होता. तसंच, कंपनीचं एकूण उत्पन्न ११,०१८.७३ कोटींवरून १४,४०१.९५ कोटींपर्यंत वाढलं आहे.

WhatsApp channel

विभाग