मराठी बातम्या  /  business  /  Tata car discount : स्वस्त व सुरक्षित कार खरेदीची सुवर्णसंधी, टाटाच्या या माॅडेल्सवर ६५ हजारांची सूट
tata motors HT
tata motors HT

Tata car discount : स्वस्त व सुरक्षित कार खरेदीची सुवर्णसंधी, टाटाच्या या माॅडेल्सवर ६५ हजारांची सूट

06 December 2022, 11:54 ISTKulkarni Rutuja Sudeep

Tata car discount : टाटा मोटर्स डिसेंबर २०२२ मध्ये आपल्या पॅसेंजर्स वाहनांवर ६५००० रुपयांपर्यंत सवलत देऊ केली आहे. ही आँफर नेक्साॅन, टियागो, टिगोर सारख्या माॅडेल्सवर दिली जात आहे. जाणून घ्या डिटेल्स -

Tata car discount :  वाहन खरेदी करताना ग्राहकांसाठी सुरक्षितता ही अग्रस्थानी असते. त्यामुळे सुरक्षिततेसोबतच बजेट कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण टाटा मोटर्सने त्यांच्या नेक्साॅन, टियागो, टिगोरसारख्या बजेट कार्सवर डिसेंबर महिन्यात भरघोस सवलत देऊ केली आहे. यातील बहुतांश गाड्यांना सेफ्टीसाठी ५ स्टार रेटिंग्ज मिळाले आहे. यात हॅरियरचाही समावेश आहे. जाणून घेऊया कोणत्या गाड्यांवर किती टक्के सवलत देण्यात आली आहे ते ...

ट्रेंडिंग न्यूज

टाटा टियागो आणि नेक्साॅनवर सूट

कंपनी त्यांची लोकप्रिय ५ सिटर हॅचबॅक टाटा टियागो आणि सब फोर मीटर काॅम्पॅक्ट सेडान टाटा टिगोरवर ३८ हजार रुपयांपर्यंत सवलत देत आहेत. या सवलतीमध्ये २० हजार रुपयांचे कॅश बॅक आँफर, निवडक माॅडेल्सवर १५ हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ३००० रुपयांपर्यंतचे काॅर्पोरेट डिस्काऊंट देत आहेत. तर टाटा नेक्साॅनवर ५००० रुपयांचा काॅर्पोरेट डिस्काऊंट दिला जात आहे.

हॅरियर्स आणि सफारीवरही सवलत

टाटा हॅरियर्स आणि टाटा सफारीवर ६५ हजार रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. यात निवडक माॅडेल्सवर ३० हजार रुपयांपर्यंतची रोख सवलत आहे. याशिवाय ५ हजार रुपयांचा काॅर्पोरेट डिस्काऊंट आणि ३० हजार रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनसही देण्यात येत आहे.

ईव्हीवर कोणतीही सवलत नाही

कंपनीने त्यांच्या ईलेक्ट्रिक वाहनांवर कोणतीही सवलत दिलेली नाही. याशिवाय कंपनीच्या टाटा पंच आणि अल्ट्रोज या माॅडेल्सवरही कोणतीही सवलत कंपनीने जाहीर केलेली नाही.

विभाग