मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vacancy In Tata Motors : १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, टाटा मोटर्समध्ये नोकरीची संधी

Vacancy In Tata Motors : १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, टाटा मोटर्समध्ये नोकरीची संधी

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Oct 20, 2022 04:00 PM IST

सरकारच्या कौशल्य योजनेंतर्गत १२ वी पास विद्यार्थी आणि औद्योगिक प्रशिक्षणक संस्था (आयटीआय) पदवीधारकांना टाटा मोटर्समध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Tata Motors HT
Tata Motors HT

Job Vacancy in Tata Motors : वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनी टाटा मोटर्सने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भरती सुरू केली आहे. या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता आयटीआयमधील प्रशिक्षणानंतर थेट नोकऱ्या मिळत आहेत. कंपनीने आपल्या कारखान्यात तात्पुरते कामगार ठेवण्याऐवजीआयटीआयमधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले आहे.

आयटीआय आणि इयत्ता १२ वीमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स केंद्र सरकारच्या कौशल्य योजनेअंतर्गत नोकरीची संधी देत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच नोकरी करता येणार आहे.

कारखान्यांमध्ये आठ हजारांहून अधिक विद्यार्थी आयटीआयचे

टाटा मोटर्सचे एचआर विभाग अधिकारी रवींद्र कुमार म्हणाले, “आम्ही आता सरकारच्या कौशल्या योजनेंतर्गत 12वी वर्ग आणि ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) पदवीधरांना नोकरीवर घेत आहोत, यात आम्ही त्यांना नोकरीवर प्रशिक्षणही देत ​​आहोत. त्यांनी त्यांचा अभ्यास सुरू ठेवावा.”

या कामगारांना अत्याधुनिक डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. टाटा मोटर्सच्या भारतातील सात कारखान्यांमध्ये १४ हजार तात्पुरते कामगार आहेत, त्यापैकी ८ हजार आयटीआय आणि बारावीचे विद्यार्थी आहेत. टाटा मोटर्समध्ये हा उपक्रम दोन वर्षांपूर्वी सुरू झाला.

टाटा मोटर्सच्या सीएचआरओने लाईव्ह मिंट न्यूज पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, वाहन प्रकल्पातील कंत्राटी कामगार सध्या अंदाजे ७ ते ९ महिने करारावर काम करतात. हे काम कोरोना महामारीच्या काळात सुरू झाले होते. "कोविड -१९ च्या दरम्यान तात्पुरते कर्मचारी मिळणे खूप कठीण होते. कारण बरेच जण यापैकी स्थलांतरित होते आणि ते घरी गेले,

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग