share market : एका वर्षात २०० टक्क्यांहून जास्त वाढलाय टाटाचा हा शेअर, तुमच्याकडं आहे का?-tata investment share surged more than 200 in one year do you have stock market news in marathi ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  share market : एका वर्षात २०० टक्क्यांहून जास्त वाढलाय टाटाचा हा शेअर, तुमच्याकडं आहे का?

share market : एका वर्षात २०० टक्क्यांहून जास्त वाढलाय टाटाचा हा शेअर, तुमच्याकडं आहे का?

Aug 30, 2024 02:33 PM IST

Tata Investment Share Price : टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचा शेअर रोज रोज नवनवे उच्चांक गाठत आहे. मागच्या वर्षभरात या शेअरनं २०० टक्क्याहून जास्त परतावा दिला आहे.

एका वर्षात २०० टक्क्यांहून जास्त वाढलाय टाटाचा हा शेअर, तुमच्याकडं आहे का?
एका वर्षात २०० टक्क्यांहून जास्त वाढलाय टाटाचा हा शेअर, तुमच्याकडं आहे का?

Tata Investment Share Price : टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचा शेअर शुक्रवारी ५ टक्क्यांहून अधिक वाढून ७६६० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये ५ दिवसांत २१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 

गेल्या वर्षभरात टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९७४४.४० रुपये आहे. तर, शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक २४०९.९५ रुपये आहे. 

गुंतवणूकदारांना दिला दणदणीत परतावा

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात २०५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ३० ऑगस्ट २०२३ रोजी टाटा समूहाच्या या कंपनीचा शेअर २४३१.७० रुपयांवर होता. ३० ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर मुंबई शेअर बाजारात ७६६० रुपयांवर पोहोचला. या वर्षी आतापर्यंत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे शेअर जवळपास ७७ टक्क्यांनी वधारले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२४ रोजी टाटा समूहाच्या कंपनीचा शेअर ४२५८.३० रुपयांवर होता. ३० ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर ७६६० रुपयांवर पोहोचला आहे.

पाच वर्षांत ८०० हून अधिक टक्क्यांची वाढ

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे शेअर्स गेल्या ५ वर्षांत ८७० टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचा शेअर ३० ऑगस्ट २०१९ रोजी ७७०.८० रुपयांवर होता. ३० ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर ७६६० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये ४९० टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत ३० ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचे शेअर्स १२६२.२० रुपयांवरून ७६०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. गेल्या दोन वर्षांत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे समभाग ३८५ टक्क्यांनी वधारले आहेत.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

विभाग