मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata Power Share : टाटाचा 'हा' शेअर तुमच्याकडं असेल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी खास

Tata Power Share : टाटाचा 'हा' शेअर तुमच्याकडं असेल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी खास

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 25, 2024 03:35 PM IST

Tata Power Share Price : टाटा समूहातील टाटा पॉवर या कंपनीचा शेअर ४५० रुपयांपर्यं जाऊ शकतो, असा अंदाज मार्केट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Tata Power Share Price
Tata Power Share Price

Tata Power Share Price Today : मागचं तब्बल वर्षभर २०० ते २५० च्या मध्येच रेंगाळणारा टाटा समूहातील टाटा पॉवर कंपनीचा शेअर सध्या भलताच चर्चेत आहे. मागील तीन महिन्यांपासून हा शेअर सातत्यानं वधारत आहे. आजचा दिवसही त्यास अपवाद नव्हता. टाटा पॉवरच्या शेअरमध्ये आज एनएसईवर २.३० टक्क्यांची वाढ झाली असून तो शेअर ३६५.१५ रुपयांवर पोहोचला आहे. नजिकच्या काळात हा शेअर ४५० पर्यंत मजल मारेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

टाटा पॉवरच्या शेअरमधील आजच्या वाढीमुळं या शेअरनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक नोंदवला आहे. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चनं टाटा समूहाच्या फर्मचे दीर्घकालीन इश्यूअर रेटिंग 'IND AA' वरून 'IND AA Plus' केली आहे. हे देखील टाटा पॉवरच्या शेअरमधील वाढीचं एक कारण मानलं जात आहे. 

Mutual Fund : एसआयपीतील गुंतवणूक दरवर्षी का वाढवावी? ही आहेत ५ कारणं

टाटा समूहाचा शेअर बीएसईवर २.६८ टक्क्यांनी वाढून ३६६.५५ वर पोहोचला आहे. टाटा पॉवरच्या शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १८२.४५ रुपये आहे. 

ब्रोकरेज फर्म काय म्हणतात?

टाटा पॉवरचा शेअर एका वर्षात ८०.२५ टक्के आणि सहा महिन्यांत ६५.५५ टक्क्यांनी वाढला आहे. टाटा पॉवरचं बाजार भांडवल (Market Cap) १.१६ लाख कोटी रुपयांवर गेलं आहे. 

आयआयएफएल सिक्युरिटीजनं टाटा पॉवरबद्दल आशावाद व्यक्त केला आहे. डाव्हर्सिफिकेशनच्या आपल्या धोरणावर टाटा पॉवर ठाम आहे. टाटा पॉवरला दोन आघाड्यांवर फायद्याची अपेक्षा आहे. एक म्हणजे, विजेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे, पुरवठ्यात सुधारणा आणि AT&C तोटा कमी झाल्यामुळं वितरण विभागाला मजबूत फायदा झाला आहे, याकडं आयआयएफलनं लक्ष वेधलं आहे.

Amazon Republic Day Sale: भल्या मोठ्या टीव्हीवर ६४ टक्के सूट; अगदी स्वस्तात आणा घरी

या महिन्याच्या अखेरीपर्यंत हा शेअर ३८५ रुपयांच्या जाण्याची शक्यता आहे. ३४२ रुपयांवर स्टॉप लॉस लावावा, असा सल्ला ICICIDirect रिसर्चनं दिला आहे. शेअरनं पुन्हा तेजीचा मार्ग धरला आहे. त्यामुळं खरेदीही वाढत असल्याचं आयसीआयसीआय डायरेक्टचं म्हणणं आहे.

अँटिक ब्रोकिंगनं टाटा पॉवरची लक्ष्य किंमत पूर्वीच्या ४२२ रुपयांवरून ४५० रुपये केली आहे. तर, हा शेअर ३९० रुपयांच्या पातळीवर पोहोचेल, अशी आशा शेअरखाननं व्यक्त केली आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग