इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने गाठला आतापर्यंतचा उच्चांक, पाहा किती रुपयांवर गेला भाव?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने गाठला आतापर्यंतचा उच्चांक, पाहा किती रुपयांवर गेला भाव?

इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने गाठला आतापर्यंतचा उच्चांक, पाहा किती रुपयांवर गेला भाव?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 21, 2024 01:25 PM IST

India Hotels share price : टाटा समूहातील कंपनी इंडियन हॉटेल्सच्या शेअर्समधील तुफानी तेजी कायम असून या शेअर्सनं आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने गाठला आतापर्यंतचा उच्चांक, पाहा किती रुपयांवर गेला भाव?
इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने गाठला आतापर्यंतचा उच्चांक, पाहा किती रुपयांवर गेला भाव?

Stock Market Marathi Updates : टाटा समूहातील कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या (IHCL) शेअर्सनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचा शेअर गुरुवारी जवळपास ४ टक्क्यांपेक्षा जास्त वधारून ७९६ रुपयांवर पोहोचला. विदेशी ब्रोकरेज हाऊस जेफरीजने इंडियन हॉटेल्सचे शेअर्स खरेदी करण्यास सांगितले आहे. 

ब्रोकरेज हाऊस जेफरीजनं इंडियन हॉटेल्सच्या शेअर्ससाठी ९०० रुपयांचं टार्गेट प्राइस दिले आहे. म्हणजेच बुधवारच्या बंद पातळीवरून इंडियन हॉटेल्सच्या शेअरमध्ये जवळपास २० टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. ज्येष्ठ गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनीही टाटा समूहाच्या या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. झुनझुनवाला यांच्याकडं इंडियन हॉटेल्सचे २ कोटींहून अधिक शेअर्स आहेत. 

चार वर्षांत ६०० टक्के वाढ

इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या (IHCL) शेअरमध्ये गेल्या चार वर्षांत ६०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. टाटा समूहाच्या या कंपनीचा शेअर २० नोव्हेंबर २०२० रोजी ११०.१५ रुपयांवर होता. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचा शेअर २१ नोव्हेंबर २०२४ रोजी ७७५.३५ रुपयांवर पोहोचला. गेल्या तीन वर्षांत इंडियन हॉटेल्सचा शेअर २६७ टक्क्यांनी वधारला आहे. तर इंडियन हॉटेल्सचे शेअर्स गेल्या वर्षभरात जवळपास ८४ टक्क्यांनी वधारले आहेत. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी टाटा समूहाच्या कंपनीचा शेअर ४२०.८० रुपयांवर होता. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ७९६ रुपयांवर पोहोचला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा शेअर ७८४.५५ रुपयांवर ट्रेड करत आहे.

रेखा झुनझुनवाला यांच्याकडं किती शेअर्स?

ज्येष्ठ गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांचा टाटा समूहातील कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडं इंडियन हॉटेल्सचे एकूण २८,८१०,९६५ शेअर्स आहेत. झुनझुनवाला यांचा या कंपनीत २ टक्के हिस्सा आहे. ही शेअरहोल्डिंग ची आकडेवारी सप्टेंबर २०२४ तिमाहीपर्यंतची आहे. शेअरहोल्डिंगच्या आकडेवारीनुसार, कंपनीत म्युच्युअल फंडांचा  १३.८९ टक्के हिस्सा आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner