मराठी बातम्या  /  business  /  Air India grooming : एअर इंडियाच्या क्रूमेंबर्सचा मेकओव्हर, असा असणार नवीन लूक
Air india new uniform guidlines HT
Air india new uniform guidlines HT

Air India grooming : एअर इंडियाच्या क्रूमेंबर्सचा मेकओव्हर, असा असणार नवीन लूक

24 November 2022, 16:50 ISTKulkarni Rutuja Sudeep

एअर इंडियाने आपल्या महिला तसेच पुरुष क्रु सदस्यांच्या मेकओव्हरसाठी नवी नियमावली जारी केली आहे. कसा असणार आहे त्यांचा नवा लूक जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा - 

Air India grooming : टाटा समुहाने एअर इंडियाचे टेकओव्हर केल्यानंतर अनेक प्रकारचे बदल करण्यास सुरुवात केली आहे. यातील एक भाग म्हणजे, एअर इंडियाने आपल्या केबिन अटेंडेटसाठी ग्रुमिग गाईडलाईन्सची भली मोठी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पुरष आणि महिलांसाठी ग्रुमिंग गाईडलाईन्सचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या गाईडलाईन्समध्ये महिला व पुरुष क्रु सदस्यांनी काय करावे आणि काय करु नये याचे निर्देश देण्यात आले आहेत. एअर इंडियाने क्रु सदस्यांना आपल्या लूकवर विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. या गाईडलाईन्सचे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे.

पुरुषांसाठी नियम -

एअऱ इंडियाच्या या नियमावलीमध्ये ज्या पुरुषांचे केस कमी आहेत किंवा टक्कल आहे त्यांना बाल्ड लूक म्हणजे तूळतूळीत टक्कल करण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास या लूकसाठी डोक्यावर शेव्हिंग्ज करण्याचाही सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे, क्रु कट हेअरस्टाईल ठेवण्यासही परवानगी नाकारण्यात आली आहे. विस्कटलेले अथवा लांब केस ठेवण्यासही पुरुष क्रु सदस्यांना परवानगी नाही.

महिलांसाठी नियम

महिलांसाठीची ग्रुमिंग यादी जरा मोठीच आहे. या नियमामध्ये महिला सदस्य मोत्याचे कानातले घालू शकत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टिकलीचा पर्याय आहे, पण ती ०.५ सेंटीमीटर पेक्षा मोठी नको. हातात केवळ एकच बांगडी घालण्याची परवानगी आहे. पण त्या बांगडीवर कोणतेही डिझाईन अथवा खडे नसावेत,

महिला सदस्य केस बांधण्यासाठी हाय टाॅप नाॅट आणि लो बन्स स्टाईलचा वापर करु शकत नाहीत. फिमेल क्रु कोणत्याही डिझाईन असलेली सोनेरी आणि चंदेरी रंगाची गोल आकारातली छोटी इयररिंग्ज घालू शकतात.

दोन्ही हातांमध्ये फक्त एक - एकच रिंग्ज घालण्याची परवानगी आहे. मात्र ती अंगठी एक सेंटीमीटरपेक्षा मोठी नसावी. याशिवाय महिलांना फक्त चार बाॅबी पिन्स वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

महिलांना फेस मेक अप मस्ट

महिला सदस्यांना आयशॅडो, लिपस्टिक, नेलपेंट, हेअर शेड कार्ड्सचा वापर अत्यावश्यक करण्यात आला आहे. फ्लाईड ड्यूटीसाठी साडी आणि इंडो लेस्टर्न ड्रेसिंगमध्ये स्किन टोन स्टाॅकिंग्ज महत्त्वाचे आहेत. मेंहदी लावण्याची परवानगी नाही.

धार्मिक अथवा काळा दोरा बांधण्यास परवानगी नाही

कोणत्याही प्रकारचे धार्मिक अथवा काळेधागे बांधण्यास परवानगी कोणत्याही क्रु सदस्यांना देण्यात आलेली नाही.

 

विभाग