मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata Stocks Down : करार झाला रद्द आणि शेअर्स आले खाली,टीसीपीएल शेअर्समध्ये ७०० रुपयांची घसरण

Tata Stocks Down : करार झाला रद्द आणि शेअर्स आले खाली,टीसीपीएल शेअर्समध्ये ७०० रुपयांची घसरण

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 20, 2023 04:22 PM IST

Tata Stocks Down : टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या टाटा कन्झ्युमर प्राॅडक्ट (टीसीपीएल) चा शेअर्स आज ७०० रुपयांच्या खाली गडगडला आहे.

Tata HT
Tata HT

Tata Stocks Down : टाटा समूहातील कंपनी टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स (टीसीपीएल) चा बिसलेरी कंपनीच्या अधिग्रहणाचा करार रद्द झाला आहे. या वृत्तानंतर सोमवारी बाजारात टाटा कन्झ्युमरच्या शेअर्समध्ये २ टक्के घट झाली. ट्रेडिंग दरम्यान हा शेअर्स बीएसईवर सोमवारी ६९१.५० रुपयांवर आला.

शेअर परफाॅर्मन्स

गेल्या तीन महिन्यांमध्ये एस अँड पी बीएसई सेंन्सेक्समध्ये ७ टक्के घसऱणीच्या तुलनेत टाटा कन्झ्युमरने बाजारात १४ टक्के घट नोंदवली आहे. गेल्या वर्षात बेंचमार्क इंडेक्समध्ये १ टक्के घसरणीच्या तुलनेत या शेअर्समध्ये १० टक्के घट झाली आहे. १६ मार्च २०२३ ला शेअर्सची किंमत ६८५ रुपये होती. हा ५२ आठवड्यातील निचांकी स्तर आहे. तर १४ सप्टेंबर २०२२ ला शेअर्सची किंमत ८६१.३५ रुपये होती. ही ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी होती.

दोन वर्षे चालू होता करार

टाटा कन्झ्युमर प्रोडक्टने दोन वर्षापासून बिसलेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांच्यासोबत कराराची प्रक्रिया सुरु केली होती. मात्र गेल्या आठवड्यात तो रद्द करण्यात आला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बिसलेरीचा हिस्सा टाटा कन्झ्युमरला अंदाजे ६ ते ७ हजार कोटी रुपयांना विकण्याची योजना होती. रमेश चौहान यांनी मुलगी जयंती चौहान हिला वडिलोपार्जित व्यवसायात रस नाही म्हणून बिसलेरीचा व्यवसाय विकण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. पण आता, हा करार रद्द झाला आहे आणि जयंतीच या व्यवसायाची धुरा सांभाळणार आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग