Share Market News : रॉकेटच्या वेगानं धावतोय टाटाचा हा शेअर; गुंतवणूकदारांचा आनंद गगनात मावेना!-tata chemicals ltd share surges 13 percent today after this news share delivered 25 percent return in 5 days ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share Market News : रॉकेटच्या वेगानं धावतोय टाटाचा हा शेअर; गुंतवणूकदारांचा आनंद गगनात मावेना!

Share Market News : रॉकेटच्या वेगानं धावतोय टाटाचा हा शेअर; गुंतवणूकदारांचा आनंद गगनात मावेना!

Mar 06, 2024 07:25 PM IST

Tata Chemical Share Price : टाटा समूहातील एक महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा केमिकलचा शेअर सध्या वाऱ्याच्या वेगानं वाढतो आहे.

Tata Group Share : रॉकेटच्या वेगानं धावतोय टाटा ग्रुपचा हा शेअर; गुंतवणूकदार खूष
Tata Group Share : रॉकेटच्या वेगानं धावतोय टाटा ग्रुपचा हा शेअर; गुंतवणूकदार खूष

Tata Chemical Share Price Today : गेले वर्षभर ९०० ते १००० हजारच्या दरम्यान घुटमळणारा टाटा समूहातील टाटा केमिकलच्या शेअरनं बाजारात सध्या वादळ आणलं आहे. मागील महिनाभरापासून हा शेअर सातत्यानं वधारत आहे. आज एका दिवसात एनएसईवर हा शेअर जवळपास ११ टक्क्यांनी वाढला. त्यामुळं गुंतवणूकदार भलतेच खूष झाले आहेत.

फिच रेटिंग्समुळं कंपनीच्या शेअरच्या भावात ही वाढ झाली आहे. फिच रेटिंग्स या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं टाटा केमिकलच्या रेटिंगमध्ये बदल केला आहे. एजन्सीनं कंपनीच्या शेअरचं रेटिंग 'सकारात्मक' वरून 'स्थिर' केलं आहे. तसंच, BB+ हे रेटिंग कंपनीला दिलं आहे. 

गेल्या तिमाहीत देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोडा ॲशच्या मागणीच्या पातळीवर आव्हानांचा सामना करावा लागला. युरोप आणि अमेरिकेतील कंटेनर ग्लास आणि फ्लॅट ग्लास क्षेत्रांतील घडामोडींमुळं मागणीमध्ये चढउतार होत होते. त्याचा परिणाम व्हॉल्यूम आणि किमतींवर झाला होता.

मागणी पुरवठ्याची सध्याची स्थिती अल्प काळापुरती आहे. अगदी काही काळ ती कायम राहील. मात्र, विकासाचा वेग पाहता दीर्घकाळात त्यात सुधारणा आणि स्थिरता येईल, असं कंपनीच्या व्यवस्थापनानं म्हटलं आहे.

टाटा केमिकल ही जगातील तिसरी सर्वात मोठी सोडा अ‍ॅश उत्पादक कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०२५ ते २०२७ दरम्यान टाटा केमिकलचा Ebitda (व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई) अत्यंत उत्साहवर्धक राहील व कंपनी जोमानं वाटचाल करेल, अशी अपेक्षा फिच रेटिंग्जनं व्यक्त केली आहे.

शेअरची वाटचाल

टाटा केमिकलच्या शेअरनं मागच्या पाच वर्षांत जवळपास ३६४ टक्के परतावा दिला आहे. मागील वर्षात कंपनीनं गुंतवणूकदारांना १७ टक्के नफा मिळवून दिला आहे. मागच्या महिनाभरापासून शेअरची घोडदौड जोरात सुरू आहे. एका महिन्यात कंपनीनं जवळपास २० टक्के परतावा दिला आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची व्यक्तिगत आहेत. त्याच्याशी हिंदुस्तान टाइम्स मराठी सहमत असेलच असं नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

विभाग