Swiggy launches Fast Delivery App: फूड अँड किराणा डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने बुधवारी एक नवीन अॅप लॉन्च केले आहे. या अॅपच्या माध्यमातून १५ मिनिटांत क्विक बाइट, ड्रिंक्स आणि फूड डिलिव्हरी केली जाणार आहे. कंपनीने या अॅपला 'एसएनएसीसी' असे नाव दिले आहे. १५ मिनिटांत डिलिव्हरी देण्याबरोबरच स्विगीचे अॅप ब्लिंकिट आणि झेप्टोसारख्या कंपन्यांशीही स्पर्धा करत आहे. एसएनएसीसी अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना आता अतिशय कमी वेळात जेवण मिळणार आहे.
स्विगीचे एसएनएसीसी अॅप डिसेंबरच्या मध्यात सुरू करण्यात आले होते आणि एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ७ जानेवारी रोजी ते लाइव्ह झाले. स्विगी बोल्टने दोन किलोमीटरच्या परिघात असलेल्या लोकप्रिय रेस्टॉरंट्समधून १५ मिनिटांची डिलिव्हरी देण्याचे आश्वासन दिले आहे. बोल्ट हे स्विगी प्लॅटफॉर्मवरील फीचर आहे. तर, एसएनएसीसी आता एक नवीन अॅप आहे.
ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीवरून ऑर्डर मागवताना बऱ्याच सवलती मिळतात. त्यामुळे ग्राहकांना कमी पैशात चांगल्या पदार्थांची चव चाखता येते. त्यामुळे स्विगी हे लोकप्रिय अॅप आहे. एका रिपोर्टनुसार स्विगीला दिवसाला १.५ ते २ मिलियन हून अधिक ऑर्डर मिळतात. स्विगी हे भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे, ज्याची स्थापना २०१४ मध्ये झाली आहे. स्विगीचे मुख्यालय बंगलोर येथे आहे.