Swiggy IPO : स्विगीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आज शेवटची संधी, तज्ज्ञ काय म्हणतात पाहा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Swiggy IPO : स्विगीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आज शेवटची संधी, तज्ज्ञ काय म्हणतात पाहा!

Swiggy IPO : स्विगीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आज शेवटची संधी, तज्ज्ञ काय म्हणतात पाहा!

HT Marathi Desk HT Marathi
Nov 08, 2024 10:58 AM IST

Swiggy IPO news : स्विगीच्या आयपीओसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस असून गुंतवणुकीच्या विचारात असलेल्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

स्विगी वार्षिक रिपोर्ट 2023
स्विगी वार्षिक रिपोर्ट 2023

Swiggy IPO : स्विगीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची आज शेवटची संधी आहे. फूड आणि किराणा डिलिव्हरी सर्व्हिस देणाऱ्या या कंपनीचा आयपीओ दुसऱ्या दिवशी ०.३५ पट सब्सक्राइब झाला आहे. तर, रिटेल कॅटेगरीत ०.८६ टक्के सब्सक्राइब झाला आहे. 

स्विगीचा आयपीओ आकार ११,३२७.४३ कोटी रुपये आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून ११.५४ कोटी नवे शेअर्स आणणार असून १७.५१ कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीसाठी काढण्यात येणार आहेत. या आयपीओ विषयी तज्ज्ञांचं काय मत आहे जाणून घेऊया…

मार्केट एक्सपर्ट्स म्हणतात…

डॉ. चोक्सी फिनसर्व्हनं स्विगीच्या आयपीओला सबस्क्राइब टॅग दिला आहे. 'स्विगीचा भर हायपरलोकलवर आहे. ही फूड डिलिव्हरी क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी आहे. कंपनीची सरासरी ऑर्डर व्हॅल्यू सातत्यानं वाढत आहे. २०२२ या आर्थिक वर्षात कंपनीचे ३०१ डार्क स्टोअर्स होते, आता आर्थिक वर्ष २०२४ मध्ये त्यांची संख्या ५२३ वर गेली आहे. स्विगीचा अप्पर प्राइस बँड त्यांच्या विक्रीच्या ८ पट आहे. तरीही प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत ७६ टक्के स्वस्त आहे, असं चोक्सी फिनसर्व्हनं म्हटलं आहे.

इंडसेक सिक्युरिटीजनंही स्विगीच्या आयपीओला सब्सक्राइब टॅगही दिला आहे. ब्रोकरेज हाऊसचं म्हणणं आहे की, आर्थिक वर्ष २०२२-२४ पर्यंत कंपनीच्या महसुलात ४०.४० टक्के सीएजीआरनं वाढ झाली आहे. तर, झोमॅटोच्या महसुलात या काळात ७० टक्के सीएजीआरनं वाढ झाली आहे. हा आयपीओ दीर्घ मुदतीसाठी सब्सक्राइब केला जाऊ शकतो, असं ब्रोकरेजनं म्हटलं आहे.

आयपीओमध्ये शेअरची किंमत किती?

स्विगीच्या ३८ शेअर्सच्या आयपीओचा दरपट्टा ३७१ ते ३९० रुपये प्रति शेअर असा आहे. कंपनीनं एकूण ३८ शेअर्सचा लॉट बनवला आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांना किमान १४,८२० रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे.

ग्रे मार्केटमध्ये कसा आहे प्रतिसाद?

ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या आयपीओची स्थिती चांगली नाही. काल म्हणजेच गुरुवारी स्विगीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये ११ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत होता. जीएमपी पाहता आयपीओची लिस्टिंग फारशी उत्साहवर्धक असण्याची शक्यता नाही.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठीची नाहीत. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner