स्विगीच्या आयपीओचं आज वाटप; तुम्हाला लागला की नाही? 'असं' तपासा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  स्विगीच्या आयपीओचं आज वाटप; तुम्हाला लागला की नाही? 'असं' तपासा!

स्विगीच्या आयपीओचं आज वाटप; तुम्हाला लागला की नाही? 'असं' तपासा!

Nov 11, 2024 11:27 AM IST

Swiggy IPO allotment news : बहुचर्चित स्विगी आयपीओच्या शेअरचं वाटप आज होणार आहे. आयपीओ लागला की नाही हे कसं पाहायचं माहीत नसेल तर हे वाचा!

स्विगीच्या आयपीओचं आज वाटप; तुम्हाला लागला की नाही? 'असं' तपासा!
स्विगीच्या आयपीओचं आज वाटप; तुम्हाला लागला की नाही? 'असं' तपासा!

Swiggy IPO allotment : ऑनलाइन फूड डिलिव्हरी सर्व्हिस कंपनी स्विगीच्या बहुचर्चित आयपीओचं आज वाटप होणार आहे. आयपीओसाठी अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांना स्विगी आयपीओ रजिस्ट्रार पोर्टल, म्हणजेच लिंक इनटाइम इंडियामध्ये आपलं अलॉटमेंट स्टेटस तपासता येणार आहे.

स्विगीचा आयपीओ बुधवार, ६ नोव्हेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि शुक्रवार, ८ नोव्हेंबर रोजी बंद झाला. बीएसईच्या आकडेवारीनुसार, निविदेच्या शेवटच्या दिवशी स्विगी आयपीओ ३.५९ पट सबस्क्राइब झाला होता.

स्विगीच्या आयपीओला पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) श्रेणीत ६.०२ पट, किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार (RII) १.१४ पट तर, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार कोट्यात एकूण वर्गणीच्या ४१ टक्के आणि कर्मचारी श्रेणीत १.६५ पट सब्सस्क्रिप्शन मिळालं होतं.

आयपीओ न लागलेल्या गुंतवणूकदारांना मंगळवार, १२ नोव्हेंबरपासून त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. आयपीओ लागलेल्या गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात उद्या शेअर्स जमा होणार आहेत. स्विगी आयपीओ लिस्टिंगची तारीख बुधवार, १३ नोव्हेंबर रोजी आहे. 

तुम्हीही आयपीओसाठी अर्ज केला होता का?

स्विगी आयपीओसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर आयपीओ रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर स्विगी आयपीओ अलॉटमेंट स्टेटस चेक करू शकता. ही वेबसाइट लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची आहे. अशी आहे प्रक्रिया…

रजिस्ट्रार साइटवर स्विगी आयपीओ अलॉटमेंट स्टेटस कसे तपासावे?

> आयपीओ रजिस्ट्रार, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या https://linkintime.co.in/initial_offer/public-issues.html या वेबसाइटला भेट द्या.

> ड्रॉपडाउन मेनूमधून आयपीओ निवडा. वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाव दिसेल.

> सध्याची स्थिती पाहण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन नंबर, डीमॅट अकाउंट किंवा पॅन लिंक निवडा.

> तुमचा अर्ज प्रकार ASBA किंवा Non ASBA निवडा

>  तपशील द्या

> कृपया फॉर्म सबमिट करण्यापूर्वी कॅप्चा पूर्ण करा.

 

बीएसईवर स्विगी आयपीओ अलॉटमेंट स्टेटस कसे तपासावे?

> बीएसईच्या https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या अधिकृत वेबसाइटवरील अलॉटमेंट पेजला भेट द्या. स्विगी आयपीओ अलॉटमेंटसाठी ऑनलाइन स्टेटस चेक करा. 

> उपलब्ध 'इश्यू टाइप' पर्यायांमधून 'इक्विटी' निवडा.

> 'इश्यू नेम' अंतर्गत दिलेल्या यादीतून आयपीओ निवडा.

> तुमचा पॅन किंवा अ‍ॅप्लिकेशन नंबर टाका.

> तुमची ओळख पटवण्यासाठी 'मी रोबो नाही' वर क्लिक करा, त्यानंतर 'सबमिट' बटण दाबा.

एनएसईवर स्विगी आयपीओ अलॉटमेंट स्टेटस कसे तपासावे?

> स्विगी आयपीओ अलॉटमेंट स्टेटस ऑनलाइन तपासण्यासाठी एनएसईच्या https://www1.nseindia.com/products/dynaContent/equities/ipos/ipo_login.jsp. या अधिकृत वेबसाइटवर जा 

> एनएसई वेबसाइटवर, आपल्या पॅनचा वापर करून नोंदणी करण्यासाठी 'साइन अप करण्यासाठी येथे क्लिक करा' पर्यायावर क्लिक करा.

> तुमचे युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड इनपुट करा.

> दिसणाऱ्या नवीन पेजवर आयपीओ अलॉटमेंट स्टेटस पहा.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner