मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Suzlon Share Price : २२५ मेगावॅटचं कंत्राट मिळताच सुझलॉनचा शेअर पुन्हा पळू लागला!

Suzlon Share Price : २२५ मेगावॅटचं कंत्राट मिळताच सुझलॉनचा शेअर पुन्हा पळू लागला!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 05, 2024 05:00 PM IST

Suzlon Share Price : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात सर्वाधिक चर्चेत असलेल्या सुझलॉन एनर्जी या कंपनीविषयी मोठी बातमी आली आहे.

Suzlon  Share Price
Suzlon Share Price

Suzlon Share Price : मागचं दशकभर गुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षा घेणारा नुतनीकृत ऊर्जा क्षेत्रातील कंपनी सुझलॉन एनर्जीचा शेअर गेल्या सहा महिन्यांपासून पुन्हा सावरू लागला आहे. नुतनीकृत ऊर्जेच्या वाढत्या मागणीचा हा परिणाम आहे. कंपनीला एका मागोमाग एक ऑर्डर मिळत असून नुकत्याच मिळालेल्या एका ऑर्डरचा जबरदस्त परिणाम शेअरच्या किंमतीवर झाला आहे.

सुझलॉन एनर्जीनं २२५ मेगावॅट पवन ऊर्जेचं कंत्राट मिळवलं आहे. हे वृत्त येताच सुझलॉनच्या शेअर्समध्ये आज तब्बल ४.९१ टक्क्यांची वाढ झाली. दिवसअखेर हा शेअर एनएसईवर ४०.६० रुपयांवर बंद झाला. मागच्या वर्षभरात या शेअरमध्ये २९८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Bonus Share Explained : बोनस शेअर्स म्हणजे काय? ते का आणि कोणाला दिले जातात? जाणून घ्या सर्वकाही

मागच्या ५ दिवसांत सुझलॉनचे शेअर्स एनएसईवर ६ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. तर, सहा महिन्यांत या शेअरनं १३० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, मागच्या पाच वर्षांतील परतावा डोळे दिपवून टाकणारा आहे. मागच्या ५ वर्षात सुझलॉनच्या शेअरनं ७२७ टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. सुझलॉनचे शेअर्स ६.९५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून ४४ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. ५२ आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा ते अजूनही सुमारे ४ रुपये स्वस्त आहेत.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, सुझलॉन त्रिची जिल्ह्यातील वेंगाईमंडलम आणि तमिळनाडूमधील तुतीकोरीन जिल्ह्यातील ओट्टापिदारम इथं एव्हररेन्यू एनर्जीच्या साइटवर हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर (HLT) टॉवर आणि ७५ विंड टर्बाइन जनरेटर (WTG) उभारणार आहे. या प्रत्येकाची क्षमता तीन मेगावाट आहे.

Penny Stocks Explained : पेनी स्टॉक म्हणजे काय? त्यातील गुंतवणूक खरंच फायद्याची असते?

सुझलॉन समूहाचे उपाध्यक्ष गिरीश तांती यांनी दिलेल्या माहितीनुसार, एव्हररिन्यू एनर्जीसह हा प्रकल्प भारतीय बाजारपेठेतील आशादायी व्यावसायिक आणि औद्योगिक (C&I) विभागाशी सुसंगत आहे. ग्रीन व रिन्यूएबल एनर्जीच्या संदर्भातील राष्ट्रीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनीच्या व शेअरच्या कामगिरीची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग