सुझलॉन एनर्जीचा शेअर ७० रुपयांवर जाणार, अजूनही खरेदीची संधी, सध्या किती आहे भाव?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  सुझलॉन एनर्जीचा शेअर ७० रुपयांवर जाणार, अजूनही खरेदीची संधी, सध्या किती आहे भाव?

सुझलॉन एनर्जीचा शेअर ७० रुपयांवर जाणार, अजूनही खरेदीची संधी, सध्या किती आहे भाव?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 18, 2024 08:05 PM IST

Suzlon Energy Share News : मागच्या तीन महिन्यांपासून घसरत असलेला सुझलॉन एनर्जीचा शेअर आज किंचित वधारला. तरीही हा शेअर अद्यापही ६० रुपयांच्या खाली आहे. तज्ज्ञांना याबद्दल काय वाटतं पाहूया…

सौर आणि पवन ऊर्जा (प्रतीकात्मक प्रतिमा)
सौर आणि पवन ऊर्जा (प्रतीकात्मक प्रतिमा)

Suzlon Energy Share price : गेल्या महिनाभरात घसरलेला सुझलॉन एनर्जीचा शेअर आज काहीसा वधारला असला तरी अद्यापही तो ६० रुपयांच्या खाली ट्रेड करत आहे. हा शेअर नजिकच्या काळात ७० रुपयांवर जाऊ शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळं शेअर खरेदीसाठी झुंबड दिसत आहे.

गेल्या तीन महिन्यांत कंपनीचे शेअर्स २९ टक्क्यांनी घसरले आहेत. १२ नोव्हेंबरपासून हा शेअर ६० रुपयांच्या खाली व्यवहार करत आहे. मात्र, सोमवारी व्यवहारादरम्यान सुझलॉन एनर्जीच्या शेअरला ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किट लागलं. हा शेअर ५९.६१ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. १२ सप्टेंबर रोजी या शेअरनं ८६.०५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर मजल मारली होती. तेव्हापासून सुझलॉन एनर्जीचा शेअर सप्टेंबरच्या उच्चांकापासून ३३.११ टक्क्यांनी घसरला आहे.

चालू सत्रात बीएसईवर ग्रीन एनर्जी कंपनीचे मार्केट कॅप वाढून ७८,३१५ कोटी रुपयांवर पोहोचलं. सुझलॉन एनर्जीचा शेअर एका वर्षात ३४.३५ टक्के आणि दोन वर्षांत ६०४ टक्क्यांनी वधारला आहे. १२ डिसेंबर २०२३ रोजी सुझलॉन एनर्जीचा शेअर ३३.८३ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला होता.

या रिन्युएबल एनर्जी स्टॉकच्या संदर्भात विश्लेषकांची वेगवेगळी मतं आहेत. सेबीचे नोंदणीकृत स्वतंत्र विश्लेषक ए. आर. रामचंद्रन म्हणाले, 'सुझलॉन एनर्जी मंदीत आहे, परंतु ५३.६ रुपयांच्या पुढील समर्थनासह दैनंदिन चार्टवर थोडी जास्त विक्री देखील आहे. नजीकच्या भविष्यात ६९ रुपयांच्या उद्दिष्टासाठी दैनंदिन बंद ५९.३ च्या तुलनेत जास्त असेल तरच गुंतवणूकदारांनी खरेदी करावी. 

स्टॉकबॉक्सचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक अमेय रणदिवे म्हणाले, 'सुझलॉन एनर्जी सध्या ५८ रुपयांवर व्यवहार करत आहे. यात गेल्या तीन महिन्यांतील ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपेक्षा ३७ टक्के लक्षणीय सुधारणा झाली आहे. हा स्टॉक जास्त विकला गेल्याचे दिसून येत आहे. शेअरवरील स्टॉपलॉस ५१.५ रुपये असून टार्गेट प्राइस ७२ रुपये आहे.

 आनंद राठीचे व्यवस्थापक जिगर एस पटेल यांनी सांगितले की, या शेअरला ५३ रुपयांवर सपोर्ट असून ६६ रुपयांवर प्रतिकार दिसत आहे. ६६ रुपयांची पातळी ओलांडल्यास तो ७० रुपयांपर्यंत वाढू शकतो. शॉर्ट टर्मसाठी अपेक्षित ट्रेडिंग रेंज ५३ ते ७० रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner