stock market : सुझलॉन एनर्जीचा नवा विक्रम, 'या' खास यादीत मिळवलं स्थान, शेअरची घोडदौड सुरूच-suzlon energy share surged more than 3 percent market cap crossed 1 lakh crore rupees ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stock market : सुझलॉन एनर्जीचा नवा विक्रम, 'या' खास यादीत मिळवलं स्थान, शेअरची घोडदौड सुरूच

stock market : सुझलॉन एनर्जीचा नवा विक्रम, 'या' खास यादीत मिळवलं स्थान, शेअरची घोडदौड सुरूच

Aug 09, 2024 06:02 PM IST

Suzlon Energy Market Capital : गेल्या वर्षभरापासून सातत्यानं वाढणाऱ्या सुझलॉन एनर्जीनं आज एक नवा टप्पा ओलांडला आहे.

सुझलॉन एनर्जीचा नवा विक्रम, 'या' खास यादीत मिळवलं स्थान, शेअरची घोडदौड सुरूच
सुझलॉन एनर्जीचा नवा विक्रम, 'या' खास यादीत मिळवलं स्थान, शेअरची घोडदौड सुरूच

Suzlon Energy Market Capital : थोडीथोडकी नव्हे तर जवळपास १० वर्षे गाळात गेलेला व गुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षा पाहणारा सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचा शेअर मागील वर्षभरापासून पुनरागमन करत आहे. शेअरच्या किंमतीत सातत्यानं होत असलेल्या वाढीमुळं या कंपनीनं शेअर मार्केटमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. कंपनीचं बाजार भांडवल १ लाख कोटींच्या वर गेलं आहे. कंपनीबरोबरच गुंतवणूकदारांसाठी देखील ही आनंदाची बातमी आहे.

गेल्या सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जीचा शेअर ५० टक्क्यांहून अधिक वाढला आहे. आजही ही तेजी कायम आहे. कंपनीचा शेअर आज २ टक्क्यांहून जास्त वाढला आहे. एनएसईवर हा शेअर ७४.६० रुपयांवर उघडला. त्यानंतर ३ टक्क्यांहून अधिक वाढीसह ७५.३० रुपयांच्या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. या तेजीमुळं सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी सुझलॉन एनर्जीचं मार्केट कॅप १,००,८९४.८२ रुपये झालं.

मार्च महिन्यापासून सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ८२ टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्च २०२३ पासून कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ८३६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

कंपनीकडं ३.८ गिगावॅटची ऑर्डर

सुझलॉन एनर्जी सध्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. याचं कारण कंपनीची कामगिरी उत्तरोत्तर सुधारत आहे. तसंच, कर्ज कमी करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर सुझलॉन एनर्जीला सातत्यानं मिळणाऱ्या नवनव्या ऑर्डर्समुळं गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. ३० जून २०२५ पर्यंत सुझलॉन एनर्जीकडे ३.८ गिगावॅटच्या ऑर्डर होत्या.

रेनॉम एनर्जीची खरेदी

सुझलॉन एनर्जीनं नुकतीच रेनॉम एनर्जी सर्व्हिसेस ही कंपनी ६६० कोटी रुपयांना विकत घेणार असल्याची घोषणा केली आहे. यातील पहिला ५१ टक्के हिस्सा ४०० कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. तर, दुसरा २५ टक्के हिस्सा १८ महिन्यांत २६० कोटी रुपये देऊन खरेदी केला जाईल.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

विभाग