ऊर्जा क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीला मिळालं मोठं कंत्राट, शेअर खरेदीसाठी अक्षरश: झुंबड
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ऊर्जा क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीला मिळालं मोठं कंत्राट, शेअर खरेदीसाठी अक्षरश: झुंबड

ऊर्जा क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीला मिळालं मोठं कंत्राट, शेअर खरेदीसाठी अक्षरश: झुंबड

HT Marathi Desk HT Marathi
Dec 04, 2024 04:37 PM IST

Suzlon Share Price : मागच्या दीड वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या सुझलॉन एनर्जीला जिंदाल रिन्युएबल्सकडून आणखी एक मोठं कंत्राट मिळालं आहे. त्यामुळं कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली आहे.

Suzlon Energy Share Price : सुझलॉन एनर्जीला मिळालं मोठं कंत्राट
Suzlon Energy Share Price : सुझलॉन एनर्जीला मिळालं मोठं कंत्राट

Stock Market Updates : सुझलॉन समूहाला कर्नाटकातील जिंदाल रिन्युएबल्सकडून अतिरिक्त ३०२.४ मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प मिळाला आहे. ही बातमी येताच सुझलॉन एनर्जीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, आज हा शेअर ४ टक्क्यांनी वधारून ६८.४३ रुपयांवर पोहोचला. १२ सप्टेंबर २०२४ रोजी या शेअरनं ८६.०४ रुपयांचा उच्चांक गाठला. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.

सुझलॉन आणि जिंदाल रिन्युएबल्सची उपकंपनी असलेल्या जेएसपी ग्रीन विंड १ नं कर्नाटकातील कोप्पल भागात अतिरिक्त ३०२.४ मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पासह आपल्या भागीदारीत वाढ केली आहे. सुझलॉन समूहाचे उपाध्यक्ष गिरीश तांती म्हणाले, 'या सहकार्यामुळं आमची संयुक्त हरित पोलाद मोहिमेला बळ मिळणार आहे. तसंच, २०३० पर्यंत नॉन-जीवाश्म इंधनापासून ५० टक्के वीज मिळविण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी अक्षय ऊर्जेच्या उद्दिष्टात महत्त्वपूर्ण योगदान मिळेल. ऑक्टोबरमध्ये सुझलॉनला जिंदाल रिन्युएबल्स पॉवरकडून ४०० मेगावॅट पवनऊर्जेचं कंत्राट मिळालं होतं.

दुसऱ्या तिमाहीत दुप्पट नफा

सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत सुझलॉनचा निव्वळ नफा दुप्पट होऊन २०१ कोटी रुपये झाला आहे. ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीला १०२ कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचं एकूण उत्पन्न २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत वाढून २१२१.२३ कोटी रुपये झालं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते १४२८.६९ कोटी रुपये होतं.

सहा महिन्यात ४१ टक्क्यांचा परतावा

गेल्या सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये ४१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या शेअरनं वार्षिक आधारावर (YTD) ७४ टक्क्यांहून अधिक परतावा दिला असून दोन वर्षांत ६०० टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर परतावा दिला आहे. सुझलॉनच्या समभागांनी पाच वर्षांत ३१०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner