सुझलॉन एनर्जीचा शेअर दिवसेंदिवस घसरत असताना सीईओचा राजीनामा, आता काय होणार?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  सुझलॉन एनर्जीचा शेअर दिवसेंदिवस घसरत असताना सीईओचा राजीनामा, आता काय होणार?

सुझलॉन एनर्जीचा शेअर दिवसेंदिवस घसरत असताना सीईओचा राजीनामा, आता काय होणार?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 10, 2024 06:55 PM IST

Suzlon Energy Share Price : बऱ्याच प्रतीक्षेनंतर गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा सुझलॉन एनर्जीचा शेअर पुन्हा उताराला लागला आहे.

सुझलॉन एनर्जी शेअर किंमत सुझलॉन एनर्जी टार्गेट प्राइस सुझलॉन एनर्जी स्टॉक मार्केट न्यूज पीसी-वोक्स
सुझलॉन एनर्जी शेअर किंमत सुझलॉन एनर्जी टार्गेट प्राइस सुझलॉन एनर्जी स्टॉक मार्केट न्यूज पीसी-वोक्स

Suzlon Energy Share Price : रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन प्रोव्हायडर सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये सध्या जोरदार नफावसुली सुरू आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये दिवसेंदिवस घसरण होत आहे. सुझलॉन एनर्जीचा शेअर शुक्रवारी ७ टक्क्यांहून अधिक घसरून ६१.८४ रुपयांवर पोहोचला. त्यातच सुझलॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (न्यू बिझनेस) ईश्वरचंद मंगल यांनी राजीनामा दिला आहे. 

कंपनीनं शुक्रवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली. मंगल यांनी ८ नोव्हेंबर २०२४ रोजी ट्रेडिंग बंद झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. २८ वर्षांहून अधिक काळ या ग्रुपशी संबंधित राहिल्यानंतर माझ्यासाठी हा निर्णय खरोखरच कठीण होता, असं त्यांनी म्हटलं आहे.

कंपनीच्या शेअरची वाटचाल कशी?

"बीएसईवर सुझलॉन एनर्जीच्या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत ८६.०४ रुपये प्रति शेअर आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ३१.३५ रुपये प्रति शेअर आहे. सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये गेल्या ६ महिन्यांत ६० टक्के वाढ झाली आहे आणि २०२४ मध्ये आतापर्यंत ६५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात ६४ टक्के वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये २२०० टक्के वाढ झाली आहे. या दरम्यान त्याची किंमत २ रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत वाढली.

दुसऱ्या तिमाहीत दुपटीनं वाढला नफा

सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत सुझलॉनचा एकत्रित निव्वळ नफा जवळपास दुपटीने वाढून २०१ कोटी रुपयांवर पोहोचला. ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीला १०२ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता. कंपनीचं एकूण उत्पन्न २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत वाढून २१२१.२३ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते १४२८.६९ कोटी रुपये होतं. सुझलॉन ग्रुपचे व्हाइस चेअरमन गिरीश तांती म्हणाले, 'आमचा कोअर बिझनेस आता बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी सज्ज आहे.

सुझलॉन ग्रुपचे सीएफओ हिमांशू मोदी म्हणाले, 'लांबलेल्या अतिवृष्टीमुळे तुलनेने आव्हानात्मक असलेल्या वातावरणातही आम्ही मजबूत मार्जिन आणि वार्षिक ९६ टक्के नफ्यासह सातत्यपूर्ण विकास साधण्यात यशस्वी झालो आहोत. आम्ही अनेक धोरणात्मक उपाययोजना राबवून दीर्घकालीन गुंतवणूक करत आहोत. ही रणनीती कार्यक्षमता आणि नफा वाढविण्यासाठी आपली स्पर्धात्मकता वाढविण्यास देखील मदत करेल. सध्या कंपनीचे ऑर्डर बुक ५.१ गिगावॅट आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

 

Whats_app_banner