मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Health Insurance : सरोगसी, वंध्यत्वाचाही समावेश आता विमा कव्हरवरमध्ये, ईर्डाने जाहीर केली नियमावली

Health Insurance : सरोगसी, वंध्यत्वाचाही समावेश आता विमा कव्हरवरमध्ये, ईर्डाने जाहीर केली नियमावली

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 14, 2023 11:14 AM IST

Health Insurance : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (ईर्डा) विमा कंपन्यांना आरोग्य विम्यात सरोगसीसह वंध्यत्व उपचारांशी संबंधित खर्च कव्हर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या जोडप्यांनी सरोगसीद्वारे मूल व्हायचे आहे, त्यांना याचा खूप फायदा होईल. (Mother's day 2023)

surrogacy Mother HT
surrogacy Mother HT

Health Insurance : : विमा नियामक ईर्डा (IRDA) ने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता आरोग्य विम्यात सरोगसीचाही समावेश केला जाणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने यासाठी सर्व विमा कंपन्यांना सूचना जारी केल्या आहेत. ईर्डाने कंपन्यांना त्यांच्या आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत सरोगसी खर्च कव्हर करण्यास सांगितले. मुले जन्माला घालण्यासाठी सरोगसीचा पर्याय निवडणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

असा आहे नवा नियम 

ईर्डाने जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे की, 'सर्व आरोग्य विमा पॉलिसींमध्ये सरोगसीसह वंध्यत्वाशी संबंधित उपचारांच्या खर्चाचा समावेश झाला पाहिजे.' याचा अर्थ, आरोग्य विमा पॉलिसी आता सरोगसीशी संबंधित खर्च कव्हर करतील. यामध्ये सरोगेट आईचे वैद्यकीय उपचार, प्रसूती आणि प्रसूतीनंतरच्या काळजीचा खर्च समाविष्ट आहे.

सरोगसीची वाढती मागणी

रघनाल इन्शुरन्स ब्रोकर्सचे संचालक आणि प्रमुख अधिकारी अमित गोयल म्हणाले, “विमा कंपन्यांनी सरोगसीचे महत्त्व आणि प्रजनन उपचारांची वाढती मागणी ओळखली पाहिजे. ईर्डाने जारी केलेले परिपत्रक हे एक सकारात्मक पाऊल आहे.

सरोगसी म्हणजे काय?

सरोगसी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. जिथे एखादी स्त्री दुसर्‍या व्यक्तीसाठी किंवा जोडप्यासाठी गर्भधारणा करण्यास सहमती देते. ही अशी जोडपी आहेत जी स्वतः मूल जन्माला घालू शकत नाहीत. गेल्या काही वर्षांत ही प्रक्रिया खूप लोकप्रिय झाली आहे. याचे कारण असे की मोठ्या संख्येने जोडप्यांना प्रजनन समस्यांचा सामना करावा लागतो. तथापि, सरोगसी ही एक महाग प्रक्रिया असू शकते. अनेक जोडप्यांसाठी, या वैद्यकीय उपचाराचा खर्च सरोगसीचा पाठपुरावा करण्यात अडथळा ठरू शकतो.

आरोग्य विम्याचा फायदा

आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत सरोगसीचा समावेश करण्याच्या ईर्डाच्या हालचालीमुळे ही प्रक्रिया खर्चिक होईल. ज्या जोडप्यांना सरोगसीद्वारे मूल व्हायचे आहे, त्यांना याचा खूप फायदा होईल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग