मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share tips: ही कंपनी देणार ३०० टक्के लाभांश, शेअर २६०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

Share tips: ही कंपनी देणार ३०० टक्के लाभांश, शेअर २६०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 05, 2022 04:23 PM IST

ब्रोकरेज सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड (SIL) या लार्ज कॅप उद्योग कंपनीचा स्टॉक तेजीत आहे आणि तज्ज्ञांनीही खरेदीची शिफारस केली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनीवर कोणतेही कर्ज नाही.

Share tips HT
Share tips HT

सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड (SIL) या लार्ज कॅप उद्योग कंपनीच्या स्टॉकवर ब्रोकरेज फर्मनी खरेदीचा कौल दिला आहे. ब्रोकरेजच्या मते हा स्टॉक लवकरच २६०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड (Supreme Industries Ltd- SIL) ही भारतातील अग्रगण्य प्लास्टिक प्रक्रिया कंपनी आहे. सुप्रीम इंडस्ट्रीज लवकरच ३००% लाभांश देण्याची शक्यता आहे. कंपनीचे शेअर्स सध्या २,२४० रुपयांवर आहेत.

कंपनीचा लाभांश देण्याचा निर्णय

कंपनीच्या संचालक मंडळाने सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत अंतरिम लाभांश ३००% देण्यास मान्यता दिली आहे," कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही बाब नमूद केली असून बुधवार, ९ नोव्हेंबर २०२२ ही "रेकॉर्ड तारीख" म्हणून निश्चित केली आहे.

ब्रोकरेजचा खरेदीचा कौल

ब्रोकिंग कंपनी आयसीआयसीआय डायरेक्ट रिसर्चच्या संशोधन विश्लेषकांनी एका नोटमध्ये म्हटले आहे की "एसआयएलच्या शेअरच्या किमतीने गेल्या पाच वर्षांत ८८ टक्के परतावा दिला आहे". आम्ही स्टॉकवर आमचे 'बाय' रेटिंग कायम ठेवतो. आमची लक्ष्य किंमत २६०० रुपयांपर्यंत सुधारित केली आहे. दीर्घकालीन देशांतर्गत प्लास्टिक पाइपिंग उद्योगासाठी एक मोठा बूस्टर आहे.

कंपनी प्रोफाईल

कंपनी एक्सट्रुजन, रोटेशनल मोल्डिंग (रोटो), कॉम्प्रेशन मोल्डिंग, ब्लो मोल्डिंग आणि इंजेक्शन मोल्डिंगसह विविध प्लास्टिक प्रक्रिया तंत्रज्ञान व्यवसायात आहे. देशातील सर्वात मोठे प्लास्टिक प्रोसेसर वार्षिक ३५००० टनांपेक्षा जास्त पॉलिमरचे प्रमाण कार्यक्षमतेने हाताळतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग