व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलला सुप्रीम कोर्टाचा धक्का; शेअरमध्ये ५ टक्के घसरण
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलला सुप्रीम कोर्टाचा धक्का; शेअरमध्ये ५ टक्के घसरण

व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलला सुप्रीम कोर्टाचा धक्का; शेअरमध्ये ५ टक्के घसरण

HT Marathi Desk HT Marathi
Published Feb 14, 2025 04:34 PM IST

सुप्रीम कोर्टाने व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलच्या पुनर्विचार याचिका फेटाळल्या, ज्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या शेअरमध्ये 5% घट झाली. एजीआर मोजणीतील विसंगतीचा दावा केला गेला, पण कोर्टाने 2021 चा निर्णय कायम ठेवला.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे या 2 कंपन्यांना बसला धक्का, किंमती 5 टक्क्यांनी घसरल्या
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे या 2 कंपन्यांना बसला धक्का, किंमती 5 टक्क्यांनी घसरल्या (HT_PRINT)

व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलला सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. ज्यामुळे कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत 5 टक्क्यांची घसरण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या कंपन्यांच्या वतीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.

काय आहे प्रकरण?

टेलिकॉम कंपन्यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली. अहवालानुसार, कंपन्यांनी म्हटले आहे की, थकित समायोजित सकल महसुलाच्या (एजीआर) मोजणीत विसंगती आहे. पण या नव्या निर्णयाने २०२१ चा निर्णय कायम ठेवला आहे. त्याचबरोबर टेलिकॉम कंपन्यांना आता कोणताही कायदेशीर आधार राहिलेला नाही.

दूरसंचार विभागाने एजीआर गणनेत चुका केल्याचा युक्तिवाद दूरसंचार कंपन्यांनी केला. पण सर्वोच्च न्यायालयाने जुना निर्णय कायम ठेवला आहे. त्याचवेळी मोजणीची मागणी पुन्हा फेटाळण्यात आली. हे प्रकरण जुलै 2021 मधील आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने टेलिकॉम कंपन्यांची याचिका रद्द केली होती.

व्होडाफोन आयडियाचा शेअर आज कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजीसह ८.७५ रुपयांच्या पातळीवर उघडला. पण काही काळानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत ८.१४ रुपयांच्या पातळीवर आली. व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये आज 5 टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली.

शेअर बाजारात भारती एअरटेलच्या शेअरमध्येही घसरण सुरू आहे. कंपनीचा शेअर १७२४.१५ रुपयांच्या पातळीवर उघडला. पण तो १७०५ रुपयांच्या पातळीवर घसरला. भारती एअरटेलचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1778.95 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 1098 रुपये आहे. या महिन्याच्या सुरुवातीला भारत सरकारने एजीआर ची थकबाकी माफ करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त आले होते.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner