Sun Retail Ltd share price : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार दररोज नवनवीन विक्रम रचत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही वधारत आहेत. आज, आठवड्याच्या चौथ्या दिवशी सेन्सेक्सनं ८० हजारांचा टप्पा पुन्हा ओलांडला आहे. तर, निफ्टीनंही नवी झेप घेतली आहे. काही पेनी स्टॉकही या तेजीच्या लाटेवर स्वार झाले आहेत. सन रिटेल लिमिटेड हा असाच एक स्टॉक आहे. गुरुवारी या शेअरला पुन्हा १० टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं.
सन रिटेलच्या शेअरचा भाव आज १० टक्क्यांनी वाढून १ रुपयांवर पोहोचला. १० जानेवारी २०२४ रोजी शेअरचा भाव १.१४ रुपयांवर गेला. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक होता. आता पुन्हा हा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या जवळपास आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक ०.४६ पैसे आहे. ही किंमत गेल्या वर्षी जुलैमध्ये होती.
या कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा नसून १०० टक्के हिस्सा सार्वजनिक भागधारकांकडं आहे. शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचं झाल्या सार्वजनिक भागधारकांमध्ये रवींद्र गुप्ता, एन प्रभू, मोहन रमेश आणि खुशबू वनराज यांचा समावेश आहे.
सन रिटेलमध्ये २०२१ मध्ये दोन मोठ्या कॉर्पोरेट घडामोडी झाल्या. कंपनीनं बोनस शेअर्स आणि स्प्लिटची घोषणा केली. या अंतर्गत बोनस शेअर्सचे व्यवहार ३:५ या प्रमाणात करण्यात आले. त्याचवेळी १०:१ या प्रमाणात शेअर स्प्लिट जाहीर करण्यात आले.
सन रिटेल लिमिटेड ही कंपनी सन २००७ मध्ये अस्तित्वात आली. कापूस बियाणे, भुईमूग आणि सूर्यफूल तेल यासारख्या खाद्यतेलांचे ब्रँडिंग, व्यापार तसेच इतर कृषी आणि बिगरशेती वस्तूंचे ब्रँडिंग, व्यापार या दोन्हीमध्ये काम करणारी ही कंपनी आहे. ही कंपनी कमॉडिटी ट्रेडिंग सेवा पुरवते. त्याचबरोबर सोन्यासारख्या मौल्यवान धातूंसाठी बुलियन ट्रेडिंगही करते.
संबंधित बातम्या