मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sukanya Samrudhi : लेकीसाठी खाते उघडा फक्त २५० रु.मध्ये, वयाच्या १९ वर्षी मिळतील ५६ लाख

Sukanya Samrudhi : लेकीसाठी खाते उघडा फक्त २५० रु.मध्ये, वयाच्या १९ वर्षी मिळतील ५६ लाख

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 01, 2023 10:36 AM IST

Sukanya Samruddhi : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुडन्यूज ! सरकारने सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर वाढवून ८ टक्के केले आहेत.

Sukanya samrudhi yojana HT
Sukanya samrudhi yojana HT

Sukanya Samrudhi : सरकारने आर्थिक वर्ष २०२३ - २४ च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनेंच्या व्याजदराबाबत मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्रालयाने सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, किसान विकास पत्र, पोस्ट आॅफिस बचत योजना, सिनियर सिटिझन योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. याचा अर्थ या योजनांवर तुम्हाला अधिक व्याज मिळणार आहे. यादरम्यान सर्वात लोकप्रिय असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात वाढ केल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाहुया आता सुकन्या समृद्धी योजनेवर किती टक्के फायदा होणार आहे ते -

आता किती मिळेल व्याज

सरकारने सुकन्या योजनेवरील व्याज वाढवून ८ टक्के केले आहे. आधी ते ७.६ टक्के होते. म्हणजे गुंतवणूकदारांना आता ४० बेसिस पाॅईंट्स व्याज जास्त मिळेल. मुलींसाठी मोदी सरकारने ही योजना २०१५ साली सुरु केली होती. या योजनेंतर्गत मुलीचे आई वडिल कोणत्याही बॅक अथवा पोस्ट आॅफिसमध्ये खाते उघडू शकतात.

सुकन्या समृद्धी कॅल्क्युलेटर

तुमच्या मुलीचे वय ४ वर्षे आहे आणि तुम्ही १५ वर्षांपर्यंत १० रुपये प्रति महिना गुंतवणूक करत असाल तर प्रति वर्षी १.२०,००० रुपये जमा होती. जेव्हा तिचे वय १९ होईल तेव्हा ही रक्कम मच्युअर होईल. या दरम्यान तुम्हाला अंदाजे ५६ लाख रुपये मिळतील. हे कॅल्यक्युलेशन ८ टक्के व्याजदराप्रमाणे आहे.

असे उघडा खाते

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत पोस्ट आँफिस किंवा व्यावसायिक बँकेत खाते उघडले जाते. या योजनेंतर्गत मुलगी जन्माला आल्यापासून ते वयाच्या १० वर्षापर्यंत खाते उघडता येते. त्यासाठी किमान २५० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. जन्मदाखला, आई बाबांचे आधार पॅन कार्ड हे दस्तावेज त्यासाठी लागतात.

करबचतही होणार

सरकारच्या या योजनेमध्ये तुम्हाला आकर्षक परतावा मिळतो. पण त्याचबरोबर कर बचतही होते. कोणतीही व्यक्ती एका वर्षात अंदाजे १.५ लाख रुपये गुंतवणूक करु शकते. आयकर कलम ८० सी अंतर्गत तुम्ही करसवलतीसाठी क्लेमही करु शकतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग