'या' कंपनीचा एक शेअर जरी तुमच्याकडं असला तरी तुमचा चेहरा खुलून जाईल! ही बातमी वाचा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  'या' कंपनीचा एक शेअर जरी तुमच्याकडं असला तरी तुमचा चेहरा खुलून जाईल! ही बातमी वाचा!

'या' कंपनीचा एक शेअर जरी तुमच्याकडं असला तरी तुमचा चेहरा खुलून जाईल! ही बातमी वाचा!

HT Marathi Desk HT Marathi
Nov 08, 2024 03:17 PM IST

Sudarshan Pharma Share Split : स्मॉल कॅप कंपनी सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजच्या शेअर्सनं स्प्लिट इश्यूची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. त्यामुळं शेअरमध्ये तेजी आली आहे.

'या' कंपनीचा एक शेअर जरी तुमच्याकडं असला तरी तुमचा चेहरा खुलून जाईल! ही बातमी वाचा!
'या' कंपनीचा एक शेअर जरी तुमच्याकडं असला तरी तुमचा चेहरा खुलून जाईल! ही बातमी वाचा!

Sudarshan Pharma Industries Share Price : गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा देणाऱ्या शेअर्सच्या यादीत सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजचा समावेश आहे. या कंपनीचा एक शेअर जरी तुमच्याकडं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीनं शेअरचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला असून एका शेअरचे तब्बल १० शेअर्स होणार आहेत. 

शेअरच्या विभाजनाची रेकॉर्ड डेटही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं शेअरमध्ये पुन्हा तेजी आली असून आज अप्पर सर्किट लागलं आहे. कंपनीने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार, १० रुपये अंकित मूल्य असलेला सुदर्शन फार्माचा शेअर १० भागांमध्ये विभागला जाणार आहे. या शेअर स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू १ रुपये प्रति शेअरपर्यंत खाली येईल. 

सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजने शेअर विभाजनासाठी १८ नोव्हेंबर, सोमवार ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. या तारखेला कंपनीच्या समभागांची विभागणी केली जाणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला या शेअर स्प्लिटचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला रेकॉर्ड डेटच्या एक दिवस आधी शेअर्स खरेदी करावे लागतील.

शेअरचं विभाजन कधी आणि का होतं?

एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत खूप जास्त वाढली तर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना तो शेअर घेणं शक्य होत नाही. त्यामुळं गुंतवणुकीचा ओघ आटतो. तो वाढवण्यासाठी शेअरचं विभाजन केलं जातं. ते केल्यानंतर विभाजनाच्या प्रमाणात शेअरची किंमत खाली येते. त्यानंतर कंपनीकडं गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता असते.

कशी आहे शेअरची कामगिरी?

गेल्या ९० दिवसांत शेअरच्या किमतीत १३१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ज्यामुळे पोझिशनल गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून अधिक झाले आहेत. तर कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ६ महिन्यांत ४८२.५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसईमध्ये कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४५२.७० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५८.२० रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ९८१.८९ कोटी रुपये आहे.

कंपनीने केवळ एकदाच लाभांश दिला आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार या कंपनीनं २०२३ मध्ये गुंतवणूकदारांना लाभांश दिला. कंपनीच्या एका शेअरवर ०.३० पैशांचा लाभांश देण्यात आला.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner