नुकताच १२ फेल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच एका तरुणाचा दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जीवनातील यशस्वी प्रवास दाखवला होता. कठोर मेहनत आणि सचोटीने अनेक लोकांनी आपल्या यशाने नवा इतिहास लिहिला आहे. अशाच एका व्यक्तीबाबत आपण जाणून घेणार आहोत ज्याने १२ वीत नापास होऊनही जीवनात उत्तुंग यश संपादन केले. १२ वी फेल झाल्य़ानंतर घरच्या लोकांनी व नातेवाईकांनी टोमणे मारूनही त्याने जीवनात हार मानली नाही. आज हा युवक यशस्वी उद्योजक बनला आहे. इतकेच नाही तर त्याची कंपनी अमेरिकी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेडही आहे.
आपण बोलत आहोत गिरीश माथरूबूथम यांच्याबाबत. गिरीज जेव्हा १२ वीच्या परीक्षेत नापास झाले तेव्हा नातेवाईक व मित्रांनी त्याची खिल्ली उडवली व त्याला टोमणे मारले की, तो आयुष्यात रिक्षाच चालवू शकतो. मात्र इतके सहन करूनही गिरीशने आपले शिक्षण सुरूच ठेवले व शेवटी HCL मध्ये नोकरी मिळवण्यात यश मिळवले. त्यानंतर ते सॉफ्टवेयर कंपनी जोहो मध्ये मुख्य इंजीनिअर म्हणून काम करू लागले.
५३,००० कोटी रुपयांची झाली कंपनी -
गिरीश माथरूबूथम यांच्या कंपनीचे नाव ‘फ्रेशवर्क्स’ आहे, जी आयटी सॉल्यूशन प्रोव्हाइड करते. सध्याच्या काळात या कंपनीचे व्हॅल्यूवेशन ५३,००० कोटी रुपये आहे. गिरीशने फ्रेशवर्क्स कंपनी २०१० मध्ये सुरू केली होती, तेव्हा त्यांनी जोहोमधील नोकरीचा राजीनामा दिला होता. २०१८ पर्यंत कंपनीचे १२५ देशांमध्ये १ लाखाहून अधिक क्लाइंट बनले होते. गिरीश यांच्याकडे सध्या फ्रेशवर्क्स कंपनीतील ५.२२९ टक्के भागीदारी आहे. ज्याचीच एकूण संपत्तीत जवळपास २,३६९ कोटी रुपये आहे.
७ दिवसात कमावले ३४० कोटी रुपये -
मागील आठवड्यात गिरीशने फ्रेशवर्क्सचे शेअर विकले आहेत. त्यांनी ७ दिवसात एकूण ३९.६ मिलियन डॉलरचे शेअर विकले आहेत, जे जवळपास ३३६.४१ कोटी रुपयांचे आहेत. या हिशोबाने एका आठवड्यात त्यांनी ३३६ कोटीहून अधिकची कमाई केली आहे. त्याचबरोबर गिरीशने फ्रेशवर्क्ससोबत SaaS (सॉफ्टवेयर ऐज अ सर्विस) उद्योगात पाऊल ठेवले आहे, जे SaaS इंडस्ट्रीमधील एक दिग्गज नाव बनले आहे.
काय आहे SaaS बिझनेस?
SaaS विषयी बोलायचे तर या कंपन्या आपल्या ग्राहकांना ऑनलाइन सॉफ्टवेयर सॉल्यूशन प्रोव्हाइड करतात. सॉफ्टवेयर खरेदी आणि इंस्टॉल न करता कस्टमर या सॉल्यूशनचा वापर करण्यासाठी सब्सक्रिप्शन घेतात. यामुळे अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. ज्यामुळे त्यांना त्यांचा बिझनेस विस्तार करणे सुलभ होते.
संबंधित बातम्या