पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

झोमॅटोच्या प्लेटमध्ये उबर इट्स, २५०० कोटी रुपयांना खरेदी

झोमॅटोने उबर इट्स खरेदी केली

फूड डिलिव्हरी ऍप झोमॅटोने उबर इट्सची खरेदी केली. मिळालेल्या माहितीनुसार, २५०० कोटी रुपयांना (३५ कोटी डॉलर) हा व्यवहार झाला. अर्थात हा व्यवहार फक्त उबर इट्स या फूड डिलिव्हरी ऍप पुरताच आहे. उबरच्या कॅब सेवेशी याचा काही संबंध नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

ते काय करतात मला बघायचंय, नव्या व्हिडिओनंतर राऊतांचे विधान

दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहारानुसार उबर इट्सचे स्वतंत्र अस्तित्त्व संपुष्टात येणार आहे. त्याचबरोबर उबर इट्सला आपल्या सर्व ग्राहकांचा डेटा झोमॅटोकडे हस्तांतरित करावा लागणार आहे. उबर इट्सवरील ग्राहक झोमॅटोकडे वर्ग केले जातील. इकॉनॉमिक टाइम्समध्ये या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

उबर इट्सकडे सध्या जे कर्मचारी आहेत, ते मात्र झोमॅटोकडे हस्तांतरित केले जाणार नाहीत. एकूण १०० कर्मचारी उबर इट्सकडे आहेत. यापैकी काही जणांना कामावरून काढून टाकले जाईल तर काही जणांना उबरच्या इतर सेवांमध्ये सामावून घेतले जाईल.  

... म्हणून मुंबई पोलिसांनी तब्बल १२५३७ पोस्ट सोशल साईट्सवरून हटविल्या

झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल म्हणाले, उत्कृष्ट रेस्तराँची माहिती ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे आणि ५०० हून अधिक शहरांमध्ये फूड डिलिव्हरीचे काम आम्ही करतो आहोत. आता उबर इट्स आमच्या ताब्यात आल्यामुळे या क्षेत्रातील आमचा दबदबा आणखी वाढला आहे.