पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इन्कम टॅक्स रिटर्नमधील माहितीचे पुरावे सात वर्षे जपून ठेवा, कशासाठी माहितीये?

इन्कम टॅक्स रिटर्न

सध्याचा काळ डिजिटल आहे. खूप कमी लोक कागदपत्रे जवळ बाळगतात. अनेकांकडे महत्त्वाच्या नोंदी, कागदपत्रे डिजिटल स्वरुपातच असतात. पण जेव्हा विषय प्राप्तिकराचा येतो. त्यावेळी उत्पन्नाचे, खर्चाचे पुरावे हे खूप महत्त्वाचे असतात. त्याआधारेच गरज पडल्यास तुम्हाला तुमची बाजू प्राप्तिकर अधिकाऱ्यापुढे मांडता येते. यासाठीच प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) भरल्यानंतर त्याचे पुरावे किमान सात वर्षे जपून ठेवणे जास्त हितकारक असते. 

जम्मूसह पाच जिल्ह्यांतील २जी मोबाईल इंटरनेट सेवा सुरू

वैयक्तिक करदात्यांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत असते. यंदा केंद्र सरकारने ती ३१ ऑगस्टपर्यंत वाढवून दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या आधारे त्या वर्षातील प्राप्तिकर विवरणपत्र भरायचे असते. उदा. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या आर्थिक वर्षातील प्राप्तिकर विवरणपत्र हे ३१ जुलै २०१९ च्या आत भरणे आवश्यक असते. जर तुमच्या उत्पन्नाचे लेखापरीक्षण (ऑडिट) होणार असेल, तर सरकारने ही मुदत ३० सप्टेंबर ठेवली आहे. लेखापरीक्षण करणाऱ्यांना ३० सप्टेंबरच्या आत विवरणपत्र भरणे आवश्यक असते.

शिवसेना सोडून नारायण राणे यांनी चूक केली - गडकरी

प्राप्तिकर विवरणपत्र भरल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी आहेत किंवा त्यात उत्पन्न लपविले आहे, असे जर प्राप्तिकर अधिकाऱ्याला वाटले तर ते तुम्हाला नोटीस पाठवतात. वेगवेगळ्या कलमांनुसार या नोटिसा येत असतात. प्राप्तिकर कायद्यातील कलम १४३ (२), कलम १४७ नुसार नोटिसा येऊ शकतात. यापैकी कलम १४७ नुसार विवरणपत्र दाखल झाल्यानंतर पुढील सहा वर्षांपर्यंत नोटीस पाठविण्याचा प्राप्तिकर विभागाला अधिकार आहे. त्यामुळे प्राप्तिकर विवरणपत्र भरल्यानंतर साधारणपणे सात वर्षांपर्यंत त्याची सर्व माहिती, कागदपत्रे सुरक्षित ठेवणे उपयोगाचे असते. जर प्राप्तिकर विभागाची नोटीस आली तर त्यावेळी तुमच्याकडील माहिती उपयोगी ठरू शकते.