पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

येस बँकेवरील निर्बंध बुधवारी सहा वाजल्यापासून मागे - रिझर्व्ह बँक

शक्तिकांत दास

खासगी क्षेत्रातील येस बँकेंच्या पुनर्रचना आराखड्याला गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने या बँकेवर घातलेले निर्बंध उठविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या बुधवारी, १८ मार्चपासून येस बँकेवरील निर्बंध हटविले जातील, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. १८ मार्चला संध्याकाळी सहा वाजल्यापासून निर्बंध मागे घेतले जातील.

पुण्यातील जमाव बंदीच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

सोमवारी एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले, येस बँकेतील खातेदारांचे पैसे संपूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. खातेदारांनी या बँकेतील आपले पैसे काढून घेण्याची घाई अजिबात करू नये आणि विनाकारण ताण घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. खातेदारांचे हित लक्षात घेऊनच या बँकेच्या पुनर्रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. २६ मार्चला येस बँकेचे नवे संचालक मंडळ अस्तित्त्वात येईल, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधींनी मागितली ५० कर्जबुडव्यांची नावे

जगातील जवळपास सर्वच देशातील नियंत्रक बँकांनी आपल्या महत्त्वाच्या व्याजदरात कपात केली आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. आता रिझर्व्ह बँक या संदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर द्वैमासिक पतधोरण आढाव्याआधीच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला तर तो २०१६ मध्ये स्थापन झालेल्या पतधोरण समितीच्या निर्मितीनंतरचा पहिलाच अशा प्रकारचा निर्णय असेल.