येस बँकेचे सहसंस्थापक आणि माजी सीईओ राणा कपूर यांना मुंबईच्या विशेष न्यायालयाने दि. ११ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राणा कपूर यांना मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली रविवारी पहाटे सुमारे ३० तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती.
Mumbai's Special Holiday Court sends #YesBank founder Rana Kapoor to Enforcement Directorate custody till 11th March. He was yesterday arrested by the ED and produced today in the Court. pic.twitter.com/rFCTE4Kjbg
— ANI (@ANI) March 8, 2020
ईडीने कपूर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री छापा मारला होता. त्यानंतर सुमारे ३० तासांहून अधिक चाललेल्या चौकशीनतर बेलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयातून कपूर यांना अटक करण्यात आली. या खासगी बँकेतील आर्थिक अनियमतता आणि तिच्या संचालनात गैरप्रकाराचे आरोप समोर आल्यानंतर आरबीआय आणि केंद्र सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली.
केरळमधील एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण
ईडीने शनिवारी वरळीतील राणा कपूर यांच्या समुद्र महल निवासस्थानी तपास सुरु ठेवला होता. येस बँकेचे प्रमोटर राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची बनावट कंपनी अर्बन व्हेंचर्सला घोटाळेबाजांकडून ६०० कोटी रुपये मिळाल्याचा तपास ईडी करत आहे.