पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पी. चिदंबरम यांनी भाजपला विचारला येस बँकेने दिलेल्या कर्जाचा हिशोब

पी. चिदंबरम

रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यानंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्ला चढवला आहे. २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून २०१९ पर्यंतचा येस बँकेचा लेखाजोखा मांडत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. 

येस बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, SBI करणार २४५० कोटींची गुंतवणूक

२०१४ ते २०१९ दरम्यानच्या काळात येस बँकेने दिलेले कर्ज पाच पटीने वाढले आहे. मार्च २०१४ मध्ये येस बँकने दिलेल्या कर्जाची रक्कम ही ५५ हजार कोटी इतकी होती. मार्च २०१९ मध्ये हा आकडा २ लाख कोटी इतका झाला आहे. अवघ्या दोन वर्षांत ९८ हजार कोटी हा आकडा वाढून २ लाख कोटीवर पोहचला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी चिदंबरम यांनी केली. 

ईडीकडून येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्या वरळी निवासस्थानी छापेमारी

येस बँकेवर ओढावलेल्या परिस्थितीनंतर एसबीआयने या बँकेत २ हजार ४५० कोटीची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. एसबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे येस बँकेतील ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळेल, अशी चर्चा होती. पण या निर्णयावरही चिदंबरम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढेच नव्हे तर एसबीआयने गुंतवणूक करण्याऐवजी येस बँकेला टेक ओव्हर करुन बुडीत कर्जाची वसुली करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. सरकारने येस बँकेच्या ग्राहकांचा पैसा सुरक्षित असल्याची हमी द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. 

येस बँकेच्या ठेवीदारांचे पैसे सुरक्षित, चिंता नको - निर्मला सीतारामन

येस बँक प्रकरणातील घोट्याळ्यासंबंधी ईडीने बँकेचे संस्थापक आणि माजी सीईओ राणा कपूर यांच्या घरावर छापेमारी केली. राणा कपूर यांनी परदेशात पलायन करुन नये, यासाठी त्यांच्याविरोधात लुक आउट नोटीसही जारी करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी राणा कपूर यांनी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली होती. याप्रकरणात त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे.