पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

येस बँकेच्या खातेधारकांना दिलासा, पैसे काढण्याची मर्यादा वाढणार

येस बँक संकाटात सापडल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

संकटात सापडलेल्या येस बँकेच्या ग्राहकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर लादलेल्या निर्बंधानंतर बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा ही ५० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. मात्र महिन्याच्या अखेरीस मर्यादा वाढण्यात येणार असून ग्राहकांना यापेक्षा अधिक रक्कम काढता येईल, असे संकेत आरबीआय नियुक्त येस बँकेचे प्रशासक प्रशांत कुमार यांनी दिले आहेत.  एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. पुढील आठवड्यापासून ग्राहकांची पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. महिनाअखेरपर्यंत ग्राहकांना आताच्या मर्यादेपेक्षा अधिक पैसे निश्चित काढता येतील, असे त्यांनी म्हटले आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा घसरण; वाचा आजचे दर

याशिवाय येस बँकेने ग्राहकांना आणखी एक दिलासा दिला आहे. क्रेडिट कार्ड आणि इतर कर्जाचा भरणा इतर बँकेच्या माध्यमातून करण्याची सुविधा बँकेने उपलब्ध करुन दिली आहे. येस बँकेने ट्विटरच्या माध्यामतून यासंदर्भातील माहिती दिली आहे. आरबीयाने निर्बंध बँकेवर निर्बंध लादल्यानंर एटीएम आणि ऑनलाईन व्यवहारामध्ये ग्राहकांना अडचणी येत होत्या.  

पी. चिदंबरम यांनी भाजपला विचारला येस बँकेने दिलेल्या कर्जाचा हिशोब

येस बँकेने ट्विट केले आहे की,  आयएमपीएस/एनअएफटी सेवा बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता दुसऱ्या बँक खात्यावरुन क्रेडिट कार्ड तसेच कर्जाची परत फेड करणे शक्य होणार आहे. येस बँकेची एटीएम सेवाही पूर्ववत सुरु करण्यात आली असून ग्राहकांना मर्यादित रक्कम एटीएमच्या माध्यमातूनही काढता येईल, असा उल्लेखही ट्विटमध्ये करण्यात आला आहे. येस बँकेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी)  अटक केली असून यासंदर्भात त्यांची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान ग्राहकांचे पैसे सुरक्षित असून त्यांचा पैसा बुडणार नाही, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून देण्यात आले होते.