पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Yes Bank: ३० तासांच्या चौकशीनंतर ईडीने राणा कपूर यांना केली अटक

राणा कपूर

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी पहाटे दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडशी (डीएचएफएल) निगडीत मनी लाँड्रिंग प्रकरणी येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांना अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सुमारे ३० तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. 

निर्भया प्रकरणः दोषी मुकेशच्या याचिकेवर १६ मार्चला सुनावणी

राणा कपूर यांना रविवारी सकाळी सुमारे ११ वाजता न्यायालयात सादर केले जाणार आहे. ईडीने शनिवारी वरळीतील राणा कपूर यांच्या समुद्र महल निवासस्थानी तपास सुरु ठेवला होता. येस बँकेचे प्रमोटर राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची बनावट कंपनी अर्बन व्हेंचर्सला घोटाळेबाजांकडून ६०० कोटी रुपये मिळाल्याचा तपास ईडी करत आहे. 

भ्रष्टाचारात सामील असलेल्या डीएचएफएलने बँकेकडून मिळालेल्या ४४५० कोटी रुपयांसाठी या कंपनीला पैसे दिले होते. त्याचा तपास केला जात होता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, येस बँकेने डीएचएफएलला ३७५० कोटी रुपयांचे कर्ज आणि डीएचएफएलद्वारा नियंत्रित कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हपर्सला ७५० कोटी रुपयांचे आणखी एक कर्ज दिले होते. 

देशातील आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी

अधिकाऱ्यांच्या मते, जेव्हा या दोन कंपन्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. तेव्हाही येस बँकेने कारवाई सुरु केली नाही. कारवाई होऊ नये म्हणून डीएचएफएलकडून कपूर यांनी पैसे घेतल्याचा संशय आहे. 

ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा राणा कपूर यांची चौकशी सुरु केली होती. शनिवारी सकाळपर्यंत ही चौकशी सुरु होती. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास पुढील चौकशीसाठी त्यांना ईडीच्या बलार्ड इस्टेट येथील कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना रविवारी पहाटे ३ वाजता अटक करण्यात आली. 

Womens Day Special : ती पंतप्रधान निवडू शकते पण जोडीदार नाही?

ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये त्यांच्यी तीन मुली आणि प्रभादेवी येथील येस बँकेच्या मुख्यालयाचीही चौकशी केली. मुलींचा जबाब नोंदवला जाईल आणि कपूर कुटुंबीयांच्या आर्थिक देवाण-घेवाणीचीही चौकशी केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

येस बँकेने व्होडाफोन, डीएचएफएल, एस्सेल आणि अनिल अंबानी समूहासारख्या संकटग्रस्त कंपन्यांना कर्ज दिले आहे.

जागतिक महिला दिन विशेष : ती, तो आणि कपडे