पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Yes बँकेत ऍक्सिस, कोटक, HDFC आणि ICICI करणार ३१०० कोटींची गुंतवणूक

येस बँक

खासगी क्षेत्रातील ऍक्सिस बँक पण संकटग्रस्त येस बँकेत ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. येस बँकेच्या पुनर्बांधणी योजने अंतर्गत ऍक्सिस बँक ६० कोटी शेअर ६०० कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. त्याचबरोबर एचडीएफसी बँकेनेही येस बँकेत १००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा बँकही येस बँकेत ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 

येस बँकेच्या पुनर्बांधणी आराखड्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

शेअर बाजारात पाठवण्यात आलेल्या सूचनेत ऍक्सिस बँकेने म्हटले आहे की, त्यांच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत येस बँकेत दोन रुपयांचे प्रत्येकी ६० कोटी शेअर आठ रुपयांच्या प्रीमियमवर ६०० कोटी रुपयांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. येस बँकेत ही गुंतवणूक बँकिग नियमन कायदा, १९४९ अंतर्गत प्रस्तावित योजना येस बँकेच्या पुनर्बांधणी अंतर्गत केली जाईल. 

दरम्यान, येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या बँकेच्या खातेदारांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात शासकीय आदेश जारी झाल्यानंतर तीन दिवसांत येस बँकेवरील निर्बंध मागे घेतले जातील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. त्याचप्रमाणे येस बँकेच्या पुनरूज्जीवनासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून मंजूर आराखड्यानुसार स्टेट बँक त्या बँकेचे ४९ टक्के भागभांडवल संपादित करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८१ वरः आरोग्य मंत्रालय