पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे १९३० नंतर प्रथमच जगात महामंदी येणारः आयएमएफ

ख्रिस्टिलिना जार्वीवा

जगभरातील देशांना कोरोना विषाणूने घेरले आहे. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख ख्रिस्टिलिना जार्वीवा यांनी जगाला १९३० मधील महामंदीनंतरच्या सर्वांत वाईट आर्थिक घसरणीचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. २०२० मध्ये जागतिक विकास  वेगाने नकारात्मक होईल आणि १७० हून अधिक देशातील व्यक्तींची उत्पन्न वाढ त्याच दिशेने मार्गक्रमण करेल, असेही त्यांनी म्हटले. 

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन कोणाला देऊ नका, नियमावली जारी

त्या पुढे म्हणाल्या की, २०२० मध्ये जागतिक विकास नकारात्मक होईल, हे आधीच स्पष्ट आहे. वास्तविक आपल्याला या मोठ्या मंदीनंतर सर्वांत वाईट आर्थिक घसरणीचा सामना करावा लागू शकतो. 

लवकरच मोठी घसरण

ख्रिस्टिलिना जार्वीवा यांनी सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त करताना म्हटले की, कोरोना विषाणूमुळे जगातील अर्थव्यवस्थेत १९३० च्या महामंदीनंतरची सर्वांत मोठी घसरण दिसू शकते. जग या संकटाच्या कालावधीवरुन अनिश्चित आहे. पण हे आधीच स्पष्ट झाले आहे की, २०२० मध्ये जागतिक वृद्धी दरांत मोठी घसरण होईल. 

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात भारत मोठ्या प्रमाणात यशस्वी, तरीही...

३ महिन्यांत सर्व बदलले

त्या पुढे म्हणाल्या की, आमच्या १६० सदस्य देशातील प्रति व्यक्तीचे उत्पन्न वाढेल, असा आमचा तीन महिन्यापूर्वी अंदाज होता. आता सर्वकाही बदलले आहे. आता १७० हून अधिक देशातील प्रति व्यक्तीचे उत्पन्न घटण्याचा अंदाज आहे. या आर्थिक संकटामुळे कमकुवत देशांना सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. उभरत्या बाजारपेठा आणि कमी उत्पन्न असलेले आफ्रिकन, लॅटिन अमेरिका आशियातील बहुतांश क्षेत्रात अधिक जोखीम आहे. 

दादरमधील खासगी रुग्णालयातील २ नर्सला कोरोना; २८ नर्स क्वारंटाइन

गरीबांसाठी मोठे आव्हान

दाट लोकसंख्या असलेली शहरे आणि गरीबीशी झगडत झोपडीत राहत असणारे लोक या विषाणूचा सामना करत आहेत. त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे, असेही त्या म्हणाल्या.