पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

SBI एटीएममध्ये आता डेबिट कार्डशिवायही मिळणार पैसे

एसबीआय एटीएम

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक एटीएममध्ये यापुढे डेबिट कार्डशिवायही पैसे काढता येऊ शकणार आहेत. पण त्यासाठी ग्राहकांकडील मोबाईलवर बँकेचे योनो ऍप असणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून ग्राहक एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत. देशातील १६५०० एटीएममध्ये सुरुवातीला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गहुंजे बलात्कार आणि हत्या प्रकरणः दोषींची फाशी हायकोर्टाकडून रद्द

ज्या एटीएममध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. तिथे बाहेर योनो कॅश असे स्टिकर लावण्यात आलेले असेल. या ठिकाणी गेल्यावर ग्राहकांना पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये डेबिट कार्ड टाकण्याची गरज पडणार नाही. ग्राहक त्यांच्या मोबाईलमधील योनो ऍपच्या माध्यमातून पैसे काढण्यासाठी विनंती पाठवू शकतात. त्यासाठी ग्राहकांना त्यांच्या मोबाईलमध्ये सहा अंकी पिन क्रमांकही सेट करावा लागेल. जेव्हा पैसे काढायचे आहेत. त्यावेळी ती विनंती ऍपच्या माध्यमातून नोंदवावी लागेल. त्यानंतर संबंधित मोबाईल क्रमांकावर एक रेफरन्स नंबर पाठविला जाईल. यानंतर ग्राहकाला ३० मिनिटांच्या आत जवळच्या योनो सुविधा असलेल्या एटीएममध्ये जाऊन संबंधित पिन आणि रेफरन्स नंबर टाकून पैसे काढता येणार आहेत.

किमान भाडे कमी केल्यावर आता 'बेस्ट'पुढे नवा प्रश्न...

या पद्धतीने व्यवहार पूर्ण करण्यासाठी कुठेही डेबिट कार्डची गरज पडणार नाही. फक्त ग्राहकाला त्याच्या मोबाईलमध्ये योनो ऍप असणे गरजेचे आहे. एटीएममध्ये गेल्यावर तिथे स्क्रीनवर योनो कॅश हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर ग्राहकांला मोबाईलवर मिळणारा व्यवहार नंबर एटीएममध्ये टाकावा लागेल. त्यानंतर योनो पिन टाकल्यावर ग्राहकाला पैसे मिळू शकतील.