पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विप्रोच्या सीईओंचा राजीनामा, वैयक्तिक कारणांमुळे पायउतार

अबिदाली निमूचवाला

विप्रो कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून पायउतार होण्याचा निर्णय अबिदाली निमूचवाला यांनी घेतला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा संचालक मंडळाकडे सुपूर्द केला आहे. अर्थात नवीन सीईओ नेमले जात नाहीत तोपर्यंत आपण या पदावर काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. घरगुती कारणांमुळे अबिदाली यांनी राजीनामा दिल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

CAAविरोधात संसद परिसरात विरोधकांचे आंदोलन

विप्रोकडून शुक्रवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, अबिदाली हे पुढील सीईओ नेमले जात नाहीत. तोपर्यंत आपल्या पदावर कायम राहतील. विप्रोमध्ये नेतृत्त्व बदल संयमितपणे व्हावा आणि त्याचा व्यवसायावर कोणताही परिणाम होऊ नये, म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

अबिदाली यांच्या राजीनाम्यानंतर विप्रोच्या संचालक मंडळाकडून नवे सीईओ शोधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. किती वेळात नवीन सीईओ शोधले जातील, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

तिहार तुरुंगात पवन जल्लाद दाखल, फाशीची तयारी पूर्ण

गेल्या काही वर्षांपासून या पदावर कार्यरत असताना कंपनीचे अध्यक्ष अझिम प्रेमजी त्यांचा मुलगा रिषाद प्रेमजी आणि संचालक मंडळाने केलेल्या सहकार्याबद्दल अबिदाली यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. विप्रोसाठी इतक्या मोठ्या पदावर काम करणे माझ्यासाठी अभिमानास्पद होते. या काळात कंपनीसाठी महत्त्वाचे ठरणारे अनेक निर्णय घेण्यात आले. कंपनीच्या ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून आवश्यक निर्णय घेण्यात आले, असेही त्यांनी म्हटले आहे.