पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काही मिनिटांत बुडाले ५ लाख कोटी

(छाया सौजन्य : पीटीआय)

कोरोना विषाणुचा मोठा फटका जगभरातील अर्थव्यवस्थेला बसला आहे. सलग सहाव्या दिवशी सेन्सेक्स कोसळला आहे. यामुळे अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी  बुडाले आहेत. मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी दिवसाच्या सुरुवातीलाच निर्देशांकात ११०७. ४१ अंकाची मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ११०७. ४१अंकांनी घसरुन  ३८, ६३८ वर आला.

कोरोनाचा कहर, शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ११०७ अंकानी कोसळला

जगभरातील बाजार व्यवस्थेला कोरोनानं पोखरायला सुरुवात केली आहे. आठवड्याभरापासून जगभरातील शेअर बाजारात पडझड झाली आहे. २००८ नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच जागतिक अर्थव्यवस्थेला याचा परिणाम सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक, पुरवठा यासगळ्यांची साखळी बिघडली आहे त्यामुळे अमेरिका, युरोपमध्ये मंदीची तीव्रता अधिक जाणवेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे चीनमध्ये २८०० लोक दगावले  आहेत तर जगभरातील ८३ हजार लोकांना याचा संसर्ग झाला आहे. 

'बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांची अचूक माहिती द्या, ५००० रुपये मिळवा'

शुक्रवारी सकाळी शेअर मार्केटची सुरुवात होताच एचडीएफसी, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, टाटा स्टील सारख्या कंपनींच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झालेली पहायला मिळाली.