पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून १६ मार्चपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झालेला नाही

पेट्रोल-डिझेलच्या दरात घट

कोरोना विषाणूचे संक्रमण आणि त्यानंतर जगातील विविध देशांमध्ये जारी करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे कच्च्या तेलाच्या बाजारात मागणी एकदम घसरली आहे. त्याचाच परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या १७ वर्षांतील नीचांकी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. असे असले तरी भारतात १६ मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. या दोन्ही इंधनाचे दर जैसे थेच आहेत. 

अशीही मदत..., वडिलांच्या तेराव्याऐवजी गरिबांना केले अन्नदान

नाव न उघड करण्याच्या अटीवर एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरण प्रकल्पांना त्यांचा तोटा भरून काढता यावा, यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले असले तरी भारतात १६ मार्चपासून दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. असे असतानाच केंद्र सरकार पुन्हा एकदा या दोन्ही इंधनांवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा विचार सुरू केला आहे. जेणेकरून सरकारला जास्तीचा महसूल मिळेल. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या दोन्ही इंधनांवरील उत्पादन शुल्कात वाढ केली होती. 

१४ मार्चला घेतलेल्या निर्णयात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ३ रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. उत्पादन शुल्कात एक रुपयाने वाढ केली तर सरकारला वर्षाला १४५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळतो. 

ICCच्या पेटाऱ्यातून: पुन्हा एकदा पहा धोनी-कोहलीची झलक!

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सोमवारी ६.६२ टक्क्यांनी घसरले. प्रतिबॅरल हे दर २३.२८ डॉलरवर जाऊन पोहोचले आहेत.